किनवट,दि.२. : शहरातील सिद्धार्थ नगरातील जेतवन बौद्ध विहारात 'फुले-आंबेडकर संयुक्त जयंती शहर व तालुका समिती उत्सव समिती'ची कार्यकारिणी निवडण्या संदर्भात नुकतीच बैठक घेण्यात आली.
बैठकीच्या अध्यक्षस्थानी बौद्ध महासभेचे संस्कार सचिव महेंद्र नरवाडे हे होते,तर प्रमुख पाहुणे म्हणून रमेश मुनेश्वर हे उपस्थित होते. यावेळी सर्वानुमते संयुक्त जयंती उत्सव समितीच्या शहर व तालुका अध्यक्षपदी सामाजिक कार्यकर्ते अॅड. सम्राट मिलिंद सर्पे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.तसेच अन्य पदाधिकारीही बिनविरोध निवडण्यात आले,ते असे; उपाध्यक्ष - आकाश सर्पे व संघर्ष घुले, सचिव-सतिष कापसे ,सहसचिव- कामेश मुनेश्वर कोषाध्यक्ष- अनिल कांबळे व निवेदक कानिंदे,सहकोषाध्यक्ष- शुभम पाटील,
संयोजक-निखिल वि. कावळे
संघटक म्हणून गौतम पाटील, सुमेध कापसे, प्रसेनजित कावळे, विनोद सी. भरणे, सचिन कावळे, शिलरत्न कावळे,रूपेश भवरे, आकाश आळणे, सिंद्धात नगराळे, निखिल सर्पे, वैभव नगराळे यांची निवड करण्यात आली. बैठकीत संयुक्त जयंती उत्सवा निमित्त विविध समाजपयोगी कार्यक्रम राबविले जाणार असल्याचे नवनियुक्त पदाधिका-यांनी सांगितले.यात आरोग्य तपासणी व उपचार शिबीर, स्पर्धा परिक्षा मार्गदर्शन शिबिर, सांस्कृतिक प्रबोधन संध्या व भोजनदान यांचा समावेश आहे.
यावळी डॉ. अभिजित ओव्हाळ, डॉ. आशिष बनसोड़, डॉ.पवन मोरे, , अॅड. सुनिल येरेकार, मारोती मुनेश्वर, सुरेश जाधव,माधव कावळे, प्रविण गायकवाड, सुरज भालेराव, प्रा. सुरेश कावळे, सुरेश मुनेश्वर, पंकज नगारे, सुमेध कापसे , राजेश पाटील,प्रा. सुबोध सर्पे, सुगत, नागराळे, सुगत भरणे, रवि कांबळे आदी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment