किनवट प्रतिनिधी :
घरची परिस्थिती हालाखीची आहे,वेळेवर शैक्षणिक सोयी सुविधा उपलब्ध होत नाहीत अशी बोलघेवडी कारणे सांगून आपल्या ध्येयापासून पळून जाऊ नका, तुम्हाला तुमची परिस्थिती बदलायची असेल तर संकटांना, अडीअडचणींना सामोरे जा,तुमच्यात प्रचंड क्षमता आहे तुम्ही प्रत्येक संकटांना व अडीअडचणींना मात दिल्याशिवाय ध्येयप्राप्ती होत नाही असे स्पष्ट करत जिंदगी एक मिनिट मे नही बदलती मगर एक मिनिट मे लिया फैसला पूरी जिंदगी बदल देता है! असे स्फूर्तीदायक विचार परभणी येथील स्वामी विवेकानंद करिअर अकॅडमीचे सुप्रसिद्ध व्याख्याते विठ्ठल कागणे यांनी किनवट येथे मांडले आहे
छत्रपती शिवाजी महाराज, संत सेवालाल महाराज,संत गाडगेबाबा व माता रमाई यांच्या संयुक्त जयंती दिनानिमित्त गोकुंदा येथील गोपीकिशन मंगल कार्यालयात ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन मेळाव्याचे आयोजन केले होते त्यावेळी प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी महात्मा ज्योतिबा फुले विद्यालयाच्या प्राचार्य सौ शुभांगी ताई प्रशांत ठमके ह्या होत्या तर मंचावर भाजप नेते रामदास पाटील सुमठानकर, युवक काँग्रेसचे प्रदेश सचिव डॉ निरंजन केशवे, युवा सेनेचे जिल्हाध्यक्ष संदेश पाटील,अभि प्रशांत ठमके, शिवसेनेचे तालुकाप्रमुख बालाजी मुरकुटे, भाजपाचे संदीप केंद्रे, उमाकांत कराळे,मा.नगरसेवक अभय महाजन मारुती सुंकलवाड,प्रा अजय पाटील, बबन वानखडे. संतोष आङकिने.शिवा पवार. राजू तामगाडगे,प्रा ठाकूर सर, एड विजय कदम, लक्ष्मीकांत कापसे, सदाशिव जोशी, शेख जाकीर,, अमन सर, यशवंत अकॅडमीचे, राजेश कदम आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती. यावेळी कागणे यांनी उच्चपदस्त अधिकाऱ्यांचे दाखले देत वेगवेगळ्या क्षेत्रातील अभ्यासक्रम व परीक्षाविषयी विध्यार्थ्यांत मिसळून विस्तृत मार्गदर्शन केले.
प्राचार्य सौ शुभांगीताई ठमके यांनी अध्यक्षीय समारोप प्रसंगी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या अडीअडचणी बद्दल माहिती देत किनवट तालुक्यातील शैक्षणिक संस्थेच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणाचे कौतुक केले व आदिवासी दुर्गम भागातील विद्यार्थ्यांची कुवत पाहता त्यांना योग्य मार्गदर्शनाची गरज असल्याचे सांगितले. प्रास्ताविक भाषणातून कार्यक्रमाचे आयोजक अजय कदम पाटील युवासेना तालुकाप्रमुख यांनी कार्यक्रमाच्या आयोजनामाची भूमिका विशद केली
प्रारंभि पोलीस निरीक्षक दीपक बोरसे यांच्या हस्ते व मान्यवरांच्या उपस्थितीत महापुरुषांना अभिवादन करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले तदनंतर स्वागत अध्यक्ष एड सुनील येरेकर यांच्या हस्ते प्रमुख वक्ते व मंचावर उपस्थित मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन येथोचित स्वागत केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा दगडू भरकड यांनी केले तर आयोजक युवासेना तालुकाप्रमुख अजय कदम पाटील यांनी उपस्थितांचे आभार मानले या कार्यक्रमास किनवट व माहूर तालुक्यातील विद्यार्थी पालक व शिक्षकांनी अलोट गर्दी होती .
No comments:
Post a Comment