दैनिक वृत्तरत्न सम्राटचे संपादक "सम्राट"कार बबनराव कांबळे स्मृती अभिवादन सभेचे आयोजन - Middlepathnews

लाइव न्यूज़

Wednesday 1 March 2023

दैनिक वृत्तरत्न सम्राटचे संपादक "सम्राट"कार बबनराव कांबळे स्मृती अभिवादन सभेचे आयोजन

छत्रपती संभाजीनगर ,दि 2 मार्च (प्रतिनिधी )

दैनिक वृतरत्न सम्राटचे संपादक "सम्राट"कार बबनराव कांबळे साहेब यांचे दिनांक 8 फेब्रुवारी 2023 रोजी आकस्मिक निधन झाले.चळवळीतले एखादं उमदे नेतृत्व अचानक जाण्याने  आंबेडकरी चळवळ पोरकी झाली .

"सम्राट"कार बबनराव कांबळे आणि छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद)चे नाते अत्यंत आपुलकी आणि जिव्हाळ्याचे होते.आंबेडकरी सांस्कृतीक चळवळींतला "भीमबाणा" ह्या ऐतिहासिक महानाट्याचा पहिला  प्रयोग त्यांनी छत्रपती संभाजीनगर (औरंगाबादला )घेतला होता .

 त्यांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी आपल्या सर्वांची जबाबदारी आणि कर्तव्य म्हणून आपण साहेबांना करुण अंतकरणाने अभिवादन करणार आहोत ..त्यासाठी डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेल्या ज्ञानभूमी  नागसेनवनात आपण अभिवादन सभेचे आयोजन केले असून छत्रपती संभाजीनगरसह मराठवाड्यातील आंबेडकरी तथा विविध परिवर्तनवादी चळवळीतील कार्यकर्ते ,नेते ,अधिकारी ,कर्मचारी ,पूजनीय भिक्खु संघ ,धम्मउपासक उपासिका, पत्रकार,लेखक, वाचक,हितचिंतक,जाहिरातदार कवी ,साहित्यक आणि समाजातील सर्व घटक असणारे आपणा सर्वाना विनम्र विनंती करण्यात येते की  दिनांक 5 मार्च 2023 रविवारी  दुपारी 2 वाजता बाबासाहेबांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेल्या आणि स्वतः डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेल्या छत्रपती संभाजीनगर  (औरंगाबाद) नागसेनवनातील पिपल्स एज्युकेशन सोसायटी (मुंबई )संचालित  पी.ई.एस.इंजिनियरिंग कॉलेज , अशोका हॉल , नागसेनवन ,छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) येथे मोठ्या संख्येने उपस्थित राहावे आणि आंबेडकरी चळवळीतील पत्रकारितेचं विद्यापीठ असणाऱ्या "सम्राट"कार बबनराव कांबळे साहेबांना अभिवादन करावे असे आवाहन सम्राट विचार मंच च्या वतीने  दैनिक वृत्तरत्न सम्राटचे मराठवाडा विभागीय प्रतिनिधी तथा जिल्हा प्रतिनिधी छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) इंजि.आनंद चक्रनारायण , शहर प्रतिनिधी  अँड नामदेव सावंत, शहर प्रतिनिधी महादेव पंडित , विशेष प्रतिनिधी डॉ सागर चक्रनारायण ,जालना जिल्हा प्रतिनिधी अर्जुन पाडेवार ,परभणी जिल्हा प्रतिनिधी दिलीप मालसमिन्दर ,नांदेड जिल्हा प्रतिनिधी संभाजी कांबळे , बीड जिल्हा प्रतिनिधी उत्तम हजारे , हिंगोली जिल्हा प्रतिनिधी प्रकाश इंगोले , उस्मानाबाद जिल्हा प्रतिनिधी विद्यानन्द वाघमारे , आणि समस्त वृत्तरत्न सम्राट परिवार मराठवाडा ,विदर्भ , खान्देश ,पश्चिम महाराष्ट्र ,यांच्यावतीने करण्यात आले आह़े ...

No comments:

Post a Comment

Pages