जनसंवाद व वृत्तविद्याजनसंवाद व वृत्तविद्या विभागातील संशोधक विद्यार्थ्यांचे आमरण उपोषण विभागातील संशोधक विद्यार्थ्यांचे आमरण उपोषण - Middlepathnews

लाइव न्यूज़

Friday 10 March 2023

जनसंवाद व वृत्तविद्याजनसंवाद व वृत्तविद्या विभागातील संशोधक विद्यार्थ्यांचे आमरण उपोषण विभागातील संशोधक विद्यार्थ्यांचे आमरण उपोषण

संभाजीनगर :

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या जनसंवाद व वृत्तविद्या विभागातील एम. फिल पूर्ण केलेल्या फेलोशिपधारक संशोधक विद्यार्थ्यांना पीएच.डी.सलग करण्यासाठी संशोधन मार्गदर्शक मिळत नसल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याची तक्रार विद्यापीठ प्रशासन यांच्याकडे वेळोवेळी केली असून सुद्धा विद्यापीठ प्रशासन याची दखल घेत नसल्याकारणाने संशोधकाच्या न्याय हक्कासाठी लोकशाही मार्गाने विद्यापीठ प्रशासनाच्या विरोधात दि. 11 मार्च 2023 पासून आमरण उपोषण करत आहेत.


सारथी, महाज्योती, बार्टी, राजीव गांधी, मौलाना आझाद अशा फेलोशिपधारक एम.फिल पूर्ण केलेल्या संशोधक विद्यार्थ्यांना कनिष्ठ ते वरिष्ठ संशोधन अधिछात्रवृत्ती (JRF ते SRF) सलग करण्यासाठी जनसंवाद व वृत्तपत्रविद्या विभागात संशोधक मार्गदर्शक उपलब्ध नाही. यामुळे 25 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांचे यामध्ये मोठ्या प्रमाणात शैक्षणिक नुकसान होत आहे.


लिबरल आर्ट, ताराबाई शिंदे स्त्री अभ्यास, पाली अँड बुद्धिजम, ग्रंथालय शास्त्र विषयाच्या आंतरविद्याशाखेच्या धर्तीवर जनसंवाद व वृत्तपत्रविद्या विभागातील विद्यार्थ्यांना संशोधन गाईड उपलब्ध करून दिले नसल्याने विद्यार्थ्यांनी उपोषणाचे हत्यार उपसले आहे.

No comments:

Post a Comment

Pages