नांदेड ,जयवर्धन भोसीकर :
प्रति वर्षी शेतकरी कुटुंबाला ६ हजार रु.मदतीचा अर्था संकल्पाची घोषणा म्हणजे भविष्यात होणाऱ्या महाराष्ट्रातील भारत राष्ट्र समितीच्या वाढ विस्तार भीतीने..
९ मार्च राज्याचे अर्थमंत्री ना.देवेंद्र फडणवीस यांनी राज्याचा अर्थ संकल्प मांडला त्यात राज्यातील शेतकरी कुटुंबाला ६ हजार रुपयाच्या अनुदानाची घोषणा केली .पण राज्यातील शेतकऱ्यांच्या वतीने तेलंगाना राज्याच्या धरतीवर प्रति वर्षी प्रति एकरी १० हजार रुपयाचे अनुदान द्यावे अशी मागणी शेतकरी नेते ,राष्ट्रवादीचे कंधार लोहा चे माजी आमदार शंकर अण्णा धोंडगे यांनी पत्रकार परिषद मध्ये केली..नांदेड विश्रामगृह येथे हि पत्रकार परिषद पार पडली..
अर्थ मंत्री यांनी केलेले घोषणा थातुर मातुर आहेत. सध्या महाराष्ट्रातील शेतकरी कापूस सोयाबीन व कांद्या सह इतर पिकाचे भाव धोरण नीती मुळे हैराण आहे..शेतकरी राजाला जपायचे असेल तर तेलंगाना मुख्यमंत्री के.चंद्र शेखरराव प्रमाणे प्रति एकरी १० हजार रु.ची मदत करा मोफत वीज ,शेती सिंचन शून्य पाणी पट्टी असे अनेक योजना राबवुन तेथील शेती व्यवसायला आधार दिला
नांदेड मधली सभेत तेलंगाना मुख्यमंत्री के.सी.आर. यांनी अब की बार किसान सरकार हि घोषणा दिली त्यामुळे सर्वांचे लक्ष बी.आर.एस.कडे गेलं येथील शेतकरी तिकडे आकर्षित झाला.रयत बंधू अशा योजना राबवा ,शेतकरी वर्गाला न्याय द्या अशी मागणी मि सरकार कडे निवेदन देऊन मि प्रत्यक्ष भेटून मि करणार आहे..
असे मा.आ.शंकर अण्णा धोंडगे यांनी पत्रकार परिषद मध्ये आपले भावना व्यक्त केल्या..राष्ट्रवादीचे शेतकरी नेते म्हणून ते परिचित आहेत..घड्याळ हाताला असताना के.सी.आर.चा गुलाबी झेंडा हातात घेतला काय असे विचारता नाही ..मि फक्त शेतकरी हिताचा प्रश्न मांडतोय असे शंकर अण्णा धोंडगे म्हणाले.
No comments:
Post a Comment