छत्रपती संभाजीनगर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या जनसंवाद व वृत्तपत्रविद्या विभागात एम.िफलचे संशोधन पूर्ण केलेल्या फेलोशिपधारक व पेट २०२१ उत्तीर्ण संशोधक विद्यार्थ्यांना पीएच.डीसाठी आंतरविद्याशाखेअंतर्गत कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांनी रिसर्च गाईड (संशोधन मार्गदर्शक) तत्काळ उपलब्ध करून द्यावेत, या मागणीसाठी शनिवारपासून (११ फेब्रुवारी) सर्व संशोधक विद्यार्थी अामरण उपोषण विद्यापीठाच्या मुख्य इमारतीसमोर सुरू केले आहे. जोपर्यंत मागण्या मान्य होणार नाहीत, तोपर्यंत या संशोधक विद्यार्थ्यांचे उपोषण सुरू राहणार अाहे, असा इशारा सर्व संशोधक विद्यार्थ्यांनी दिला आहे.
डाॅ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या जनसंवाद व वृत्तपत्रविद्या विभागात एम.फिल करणाऱ्या संशोधक विद्यार्थ्यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था, पुणे (बार्टी), राजर्षी छत्रपती शाहू महाराज संशोधन मानव विकास संस्था पुणे (सारथी), महात्मा ज्योतिराव फुले संशोधन व प्रशिक्षण नागपूर (महाज्योती), राजीव गांधी राष्ट्रीय फेलोशिप, मौलाना आजाद राष्ट्रीय फेलोशिप पीएच.डी साठी JRF ते SRF अशी सलग करण्यात आलेली आहे. परंतु जनसंवाद व वृत्तपत्रविद्या विभाग रिसर्च गाईड (संशोधन मार्गदर्शक) उपलब्ध नसल्याने फेलोशिपधारकांना पीएच.डीसाठी रिसर्च गाईड मिळत नसल्याने शैक्षणिक नुकसान होत आहे. त्यातच कुलगुरू डॉ. प्रमोद येवले, प्र. कुलगुरू, कुलसचिव यांच्याकडे वारंवार मागणी करूनही एम.फिल पूर्ण करणाऱ्या फेलोशिधारक संशोधक विद्यार्थ्यांना व पेट-२०२१ उत्तीर्ण विद्यार्थ्यांना अद्यापही रिसर्च गाईड देण्यात आलेले नाही. त्यातच संबंधित विद्यापीठ प्रशासनाने पाली अॅण्ड बुद्धीझम, लिबरल आर्टस्, फाईन आर्टस्, ग्रंथालय व माहितीशास्त्र, ताराबाई शिंदे स्त्री अभ्यास, फुले-आंबेडकर विचाराधारा, शिक्षणशास्त्र इत्यादी विषयात आंतरविद्याशाखेअंतर्गत पीएच.डीसाठी रिसर्च गाईड उपलब्ध करून दिले आहेत. परंतु जनसंवाद व वृत्तपत्रविद्या विभागाच्या फेलोिशपधारक व पेट-२०२१ उत्तीर्ण संशोधक विद्यार्थ्यांना अद्याप विद्यापीठ प्रशासन व कुलगुरूंनी रिसर्च गाईड उपलब्ध करून दिले नाहीत, त्यामुळे फेलोशिपधारकासह पेट उत्तीर्ण संशोधक विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. त्यामुळे फेलोशिपधारक व पेट उत्तीर्ण विद्यार्थ्यांना तत्काळ रिसर्च गाईड विद्यापीठ प्रशासन व कुलगुरुंनी उपलब्ध करून द्यावेत, या मागणीसाठी संतापलेल्या संशोधक विद्यार्थ्यांनी शनिवारपासून (११ फेब्रुवारी) डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या मुख्य इमारतीसमोर अामरण उपोषणाचे हत्यार उपसले आहे. जोपर्यंत रिसर्च गाईड मिळत नाही, तोपर्यंत आमरण उपोषण सुरूच राहणार आहे, असा इशारा उपोषणकर्ते गणेश शिंदे, नागेश सोनोने, भास्कर निकाळजे, विद्या वाघमारे, श्रद्धा खरात, लक्ष्मीकांत जाधव, सुमेध हिवराळे, एम. एल. शेळके आदींनी दिला आहे.
विद्यापीठ प्रशासनाकडून संशोधक विद्यार्थ्यांची पिळवणूक
मुळात रिसर्च गाईड नसणे हा विद्यापीठाचा अंतर्गत भाग आहे. विद्यार्थ्यांना रिसर्च गाईड उपलब्ध करून देणे ही विद्यापीठाची जबाबदारी आहे. त्यानंर जनसंवाद व वृत्तपत्रविद्या विभागाला आंतरविद्या शाखेअंतर्गत इतर विषयाच्या रिसर्च गाईडच्या मार्गदर्शनाखाली संशोधन करण्याची परवानगी द्यावी,अशी विनंती प्रशासनाला केली होती. त्यानुसार संबंधित संशोधक मार्गदर्शकांचे कंन्सन्ट लेटर, नाहरकत प्रमाणपत्र आदींसह कागदपत्रांची पुर्तता करण्यात आली होती. परंतु त्यावरही प्रशासनाने गांभीर्याने विचार केला नाही. एकिकडे विद्यापीठ प्रशासन म्हणते की, संशोधक मार्गदर्शक उपलब्ध नाहीत. दुसरीकडे रिसर्च गाईड उपलब्ध केले तर विद्यापीठ प्रशासन त्याला मान्यता देत नाही. एकंदरीत विद्यापीठ प्रशासनाने संशोधक विदयार्थ्यांची चालवलेली ही पिळवणूक असून प्रशासनातील अधिकारी-कर्मचारी विद्यार्थ्यांना संशोधन करण्यापासून वंचित ठेवत आहे.
No comments:
Post a Comment