जयवर्धन भोसीकर
नांदेड: राष्ट्रीय कलाल,गौड समाज युवा संघर्ष समितीचे प्रदेशाध्यक्ष तथा टायगर ग्रुप चे जिल्हा सचिव सुनिल प्रभाकर अनंतवार यांचा आज वाढदिवस दिनांक 10 मार्च 2023 रोजी वेगवेगळे सामाजिक कार्यक्रम घेऊन साजरा करण्यात आला.अवांतर बाबींवर खर्च न करता ज्या समाजात आपण जन्माला आलो त्या समाजाचे काही तरी देणे लागते या ध्येयाने सामाजिक कार्यात सतत अग्रेसर असणारे गरजू लोकांना मदतीसाठी धाऊन जाणारे धडाडीचे युवा कार्यकर्ता सुनील अनंतवार यांनी निवासी अंध विद्यालय वसरणी, नंदनवन नेरली कुष्ठधाम येथे फळं व दैनंदिन जीवनात आवश्यक सामग्रीचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी सुनील अनंतवार मित्र मंडळ, CITU च्या राज्य सचिव तथा आशा व गतप्रवर्तक च्या जिल्हाध्यक्षा कॉ उज्वला पडलवार,निवासी अंध विद्यालयाचे मुख्याध्यापक बाबाराव नंदेवार,नेरली कुष्ठधाम च्या गायकवाड ताई,अनिल पाटील पवार, शंकर रायपलवार, मनोज अनंतवार ,नागनाथ कुच्चेवार,पाटील सर,जोजार सर होळंबेसर,निकम मॅडम,भास्कर अनेराय, कलवले ,सावते,जळबा सोनकांबळे,सिद्धार्थ कांबळे,नागेश भूतके, उत्तम सोनकांबळे,सोनू शंकपाळे हे उपस्थित होते.तसेच वाढदिवसाच्या शुभेच्छा राजस्थान,मध्यप्रदेश, आंध्रप्रदेश, तेलंगना राज्य,हरियाणा,गुजरात व महाराष्ट्र राज्यातील कानाकोपऱ्यातुन सामाजिक कार्यकर्ते टायगर ग्रुप चे सचिव सुनिल अनंतवार यांच्यावर प्रेम करणाऱ्या सर्व राजकीय,सामाजिक पदाधिकाऱ्यांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा व्हिडिओ द्वारे ,फोन द्वारे,व व्हिडिओ कॉल द्वारे देण्यातआल्या यामध्ये Dysp रमेश भुरेवार, भूमाता ब्रिगेड च्या तृप्तीताई देसाई,टायगर ग्रूप चे राष्ट्रीय उपाध्यक्ष पै भैय्यासाहेब बंडगर सिनेऍक्टर डायरेक्टर मुकेश चौकसे,साऊथ स्टार सुमन गौड तलवार,क्रिश गौड,सिनेअभिनेत्री प्रीती चौकसे,हैद्राबाद येथील गोल्डन मॅन दर्गा चिन्ना पहेलवान, ऍक्टर नरेशभाई, राजू अण्णा,psi नंदकिशोर राजवाडे साहेब गडचिरोली ,टायगर ग्रुप पनवेल चे शंकर भाई जाधव,राष्ट्रीय कलाल,गौड सामाजचे अध्यक्ष अमरावेणी नरसा गौड व इतर उपस्थित होते .
No comments:
Post a Comment