विद्यापीठ विद्यार्थी परीषद, महाविद्यालयीन विद्यार्थी परीषदेच्या निवडणूका घ्या, निवडणुकीद्वारे विद्यार्थ्यांना प्रतिनिधित्वाची संधी द्या - डॉ. नरेंद्र काळे यांची अधिसभेच्या (सिनेट) बैठकीत मागणी - Middlepathnews

लाइव न्यूज़

Sunday 12 March 2023

विद्यापीठ विद्यार्थी परीषद, महाविद्यालयीन विद्यार्थी परीषदेच्या निवडणूका घ्या, निवडणुकीद्वारे विद्यार्थ्यांना प्रतिनिधित्वाची संधी द्या - डॉ. नरेंद्र काळे यांची अधिसभेच्या (सिनेट) बैठकीत मागणी

संभाजीनगर :

   सार्वजनिक विद्यापीठ कायदा - 2017 मध्ये कलम 99 अंतर्गत विद्यार्थ्यांच्या विद्यापीठ व महाविद्यालयीन निवडणुकांची तरतुद असताना देखील राज्यातील कोणत्याही विद्यापीठाने आजपर्यंत विद्यार्थ्यांमधुन निवडणूका घेतल्या नाहीत,या कडे लक्ष वेधत, येत्या शैक्षणिक वर्षांपासून विद्यार्थी निवडणूक घेण्यात याव्यात ही मागणी पदवीधर गटातून निवडुण आलेले सिनेट सदस्य तथा राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदवीधर संघटनेचे प्रदेशाध्यक्ष डॉ. नरेंद्र काळे यांनी विद्यापीठाच्या अधिसभेच्या (सिनेट) बैठकीत आज केली.

  या बाबत शासनाने आदेशित केले नाही असे उत्तर विद्यापीठाने दिले असता, कायद्यात असताना ही शासनाच्या वेगळया आदेशाची गरज काय? हा प्रतिप्रश्न ही डॉ. नरेंद्र काळे यांनी माननीय कुलगुरूंना विचारला. या बाबत विद्यापीठाच्या प्रशासनाने स्वतः पुढाकार घेऊन राज्य सरकार कडे विचारणा करावी व येत्या शैक्षणिक वर्षांपासून या निवडणुका सुरू कराव्यात ही मागणी डॉ. नरेंद्र काळे यांनी केली.

     विद्यार्थी हा विद्यापीठाचा 'केंद्र बिंदु' असुन ही विद्यार्थांचे प्रतिनिधी निर्णय प्रक्रियेत नाहीत, विद्यार्थ्यांच्या भावना व मते समजून घेण्यासाठी व खर्या अर्थाने विद्यापीठाचा कारभार विद्यार्थी केंद्र बिंदु मानून करण्यासाठी विद्यापीठ विद्यार्थी परीषद, महाविद्यालयीन विद्यार्थी परीषद, विद्यापीठ विभाग विद्यार्थी परीषद, विद्यापीठ विद्यार्थी संघटना या विद्यापीठ कायद्यात अंतर्भूत असलेल्या समित्या निवडणुकीद्वारे गठीत केल्या पाहिजेत. त्याच बरोबर अधिसभेत ही विध्यार्थी प्रतिनिधी जी जागा रीक्त आहे.

 समाजात तरूण नवीन  नेतृत्व घडवण्यासाठी ही विद्यार्थांच्या निवडणुका घेतल्या पाहिजेत असे मत डॉ. नरेंद्र काळे यांनी मांडले.

No comments:

Post a Comment

Pages