जागतिक महिला दिनानिमित्त जनाबाई पोपलवार सन्मानित - Middlepathnews

लाइव न्यूज़

Sunday 12 March 2023

जागतिक महिला दिनानिमित्त जनाबाई पोपलवार सन्मानित

नांदेड दि.१२- माजी स्काऊट गाईड आयुक्त तथा निवृत्त सहशिक्षिका श्रीमती जनाबाई मारोतराव पोपलवार यांचा आज रविवार १२ मार्च रोजी जागतिक महिला दिनानिमित्त कल्पतरू बचत गट नांदेड तर्फे गौरव सोहळा प्रा.नलिनी मुनेश्वर यांच्या हस्ते व रामचंद्र देठे यांच्या अध्यक्षतेखाली तिरंगा नगर तरोडा खुर्द येथे   सकाळी ११ वाजता   तुकाराम सरपे सुरेश मोरे, आदींच्या उपस्थितीत संपन्न झाला.सुनिता  वासाटे,कु.सृष्टी पाटील, सुनिल पोपलवार यांची भाषणे झाली.संचालन सविता सरपे यांनी केले तर आभार कु.मिताक्षी मोरे हिने मानले. 

                  

No comments:

Post a Comment

Pages