तुप्पा येथे समाज प्रबोधन पर व्याख्यान, अन्नदान, खीर दान, सांस्कृतिक कार्यक्रमासह माता रमाई आंबेडकर यांचा जयंती सोहळा संपन्न - Middlepathnews

लाइव न्यूज़

Friday 3 March 2023

तुप्पा येथे समाज प्रबोधन पर व्याख्यान, अन्नदान, खीर दान, सांस्कृतिक कार्यक्रमासह माता रमाई आंबेडकर यांचा जयंती सोहळा संपन्न


जयवर्धन भोसीकर ,विशेष प्रतिनिधी :

 नांदेड : शहरापासून जवळच असलेल्या तुप्पा येथे माता रमाई आंबेडकर यांची 125 वी जयंती साजरी करण्यात आली.माता रमाई आंबेडकर जयंती निमित्त विविध समाज उपयोगी उपक्रमाचे आयोजन करण्यात आले त्यामध्ये समाज प्रबोधन पर व्याख्यान, अन्नदान, खीरदान,सांस्कृतिक कार्यक्रम असे भरगच्च कार्यक्रम आयोजित करून माता रमाई आंबेडकरांना अभिवादन करण्यात आले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक रवी पंडित जिल्हा उपाध्यक्ष वंचित बहुजन आघाडी यांनी केले तर

 कार्यक्रमाचे उद्घाटन  वंचित बहुजन आघाडीचे राज्य प्रवक्ते फारूक अहेमद यांच्या हस्ते करण्यात आले. वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष शिवाभाऊ नरंगले यांच्या हस्ते पंचशील ध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले. त्रिसरण पंचशील भदंत संघप्रिय व का.का. पंडित यांनी दिले.

 कार्यक्रमाचे अध्यक्षा म्हणून वंचित बहुजन आघाडीच्या महिला जिल्हाध्यक्ष निरंजना ताई आवटे तर प्रमुख पाहुणे म्हणून 

 वंचित बहुजन आघाडीचे मराठवाडा सदस्य डॉक्टर संघरत्न कुरे, लॉर्ड बुद्धा चैनल चे सदाशिव गच्चे मा .पंचायत समिती सदस्य सुनील पवार ,जिल्हा महासचिव श्याम भाऊ कांबळे, महानगर अध्यक्ष विठ्ठल गायकवाड, महिला जिल्हा उपाध्यक्ष सपना खाडे ,कामगार जिल्हाध्यक्ष केशव कांबळे संजय निळेकर, कंधार तालुका अध्यक्ष संतोष पाटील गवारे.,  युवा नेते सुदर्शन कांचनगिरे, युवा शहराध्यक्ष टाक महाराज, तालुकाध्यक्ष विनायक गजभारे ,सामाजिक कार्यकर्ते उत्तम उर्फ आबा सावळे ,साहेबराव पुंडगे, सुभाष लोखंडे यासह गावातील सरपंच मंदाकिनी यन्नावार,

उपसरपंच प्रतिनिधी दत्ता पाटील कदम सर्व सन्माननीय ग्रामपंचायत सदस्य गावातील मोठ्या संख्येने नागरिक कार्यक्रमाला उपस्थित होते. या कार्यक्रमांमध्ये खिरदान रवी पंडित,सुरज पंडित, साहेबराव पंडित, राहुल डोईबळे, लक्ष्मण वाघमारे प्रवीण डोईबळे, यांच्या वतीने करण्यात आले.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन क्रांतीकुमार पंडित सुप्रसिद्ध गायक यांनी केले. तर हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी रमाई जयंती मंडळाचे अध्यक्षा छायाबाई भिमराव पंडित, उपाध्यक्ष सुजाता साहेबराव डोईबळे, सचिव शोभाबाई उत्तम डोईबळे, सहसचिव वनिता चंद्रकांत डोईबळे, सल्लागार धुरपत बाई मारुती पंडित, संघटक विद्या शिवाजी पंडित, विद्या रमेश पंडित, रमाबाई प्रकाश डोईबळे, जयश्री गोपीनाथ डोईबळे, रमाबाई सदानंद डोईबळे ,शोभाबाई माधवराव पंडित, सुषमा रावसाहेब पंडित, रेखाबाई गौतम डोईबळे, अरुणा साहेबराव डोईबळे, ज्योती रामराव पंडित, सीमाबाई विजय पंडित, रंजना हरिश्चंद्र पंडित, आशाबाई प्रेमानंद पंडित रंजनाबाई विनायक डोईबळे आदि जयंती मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले.

या कार्यक्रमासाठी गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Pages