औरंगाबाद: येथील गोगाबाबा टेकडी लगत असलेल्या महात्मा फुले कॉलनी परिसरात मूलभूत नागरी सुविधा पुरविण्यात याव्या अशी मागणी महापालिकेकडे नागरिकांनी निवेदनाद्वारे केली आहे.
प्रहार जनशक्तीचे प्रदिप दादा ञिभुवन यांच्या नेतृत्वाखाली श्री . मुन्नाभाऊ मावस्कर व डॉ. मुरलीधर इंगोले यांनी निवेदनात म्हटले की, गोगाबाबा टेकडी जवळील जेतवन कॉलनी, पेठेनगर रोड लगत असलेल्या महात्मा फुले कॉलनी येथील नागरिक मूलभूत नागरी सुविधा नसल्याने आजारी पडत आहेत, याठिकाणी ड्रेनेज नाही, रस्ता नाही, घंटा गाडी येत नाही, पाणी नाही व वीज नसणे यांमुळे आरोग्याच्या दृष्टीने लहान मुले तसेच ज्येष्ठ नागरिक सतत आजारी पडत आहेत, ड्रेनेज व रस्ते नसल्यामुळे नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत, गेल्या वीस वर्षांपासून या परिसरात नागरिक या समस्यांचा सामना करत आहेत, महात्मा फुले कॉलनी ते गोगाबाबा मंदिरा पर्यंत तत्काळ रस्ता तयार करण्यात यावा व नागरिकांना जाचक त्रासातून सुटका करावी,तसेच येथील नागरिक महानगरपालिकेचा कर भरतात व इतर कर्तव्य पार पाडत असतात, त्यामुळे येथील नागरिकांना तत्काळ मूलभूत सोयी सुविधा पुरविण्यात याव्यात अशी मागणी यावेळी करण्यात आली,
निवेदनावर डॉ.सुखदेव खंदारे, डॉ. मिलिंद आठवले, ऋतिक कांबळे व सतीश ताकवाले,सौरभ तायडे व जावळे साहेब,नरवाडे साहेब,वानखेडे, साहेब ,रगडे,भवरे,बहुरे व बगाटे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.
No comments:
Post a Comment