कतृत्वनिष्ठ महिलांच्या गौरव साहळ्याचे आयोजन - Middlepathnews

लाइव न्यूज़

Monday 6 March 2023

कतृत्वनिष्ठ महिलांच्या गौरव साहळ्याचे आयोजन


निलेश वाघमारे

छत्रपती संभाजीनगर : जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून महामाया सेवाभावी संस्थेतर्फे बुधवारी दि.८ रोजी विविध क्षेत्रातील १०१ कर्तव्यनिष्ठ महिलांचा सत्कार कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. बुधवारी दुपारी १२ वाजता शहरातील एन-७ टि.व्ही. सेंटर भागात मौलाना आझाद संशोधन केंद्रात हा कार्यक्रम संपन्न होणार आहे. तसेच यावेळी व्यावसायीक व उद्योजक महिलांचे उद्योग आधार व शॉप अॅक्ट लायसन्स मोफत काढून देण्यात येणार आहे. तरी सर्वांनी याचा लाभ घेण्याचे आवाहन राजकुमार कांबळे यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment

Pages