औरंगाबाद दि.०८ मार्च जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने गांधी भवन , शहागंज, छत्रपती संभाजी नगर (औरंगाबाद) येथील सभागृहात आयोजित कार्यक्रमात व्याख्यानाच्या कार्यक्रमाचे आयोजन डॉ.अरुण शिरसाट शहर जिल्हाध्यक्ष शहर जिल्हाध्यक्ष काँग्रेस कमिटी अनु.जा.विभाग यांनी केले होते या कार्यक्रमाला जेष्ठ सामाजिक कार्यकर्त्या प्रा.डॉ.प्रतिभा अहिरे ह्या प्रमुख वक्त्या म्हणून उपस्थित होत्या त्यांनी महिलांना बोलतांना सांगितले की, सामजिक चळवळीत सक्रिय सहभाग असणे काळाची गरज आहे, त्याशिवाय आज समाजात जी अमानवी प्रवृत्ती फोफावत आहे ती जागीच थांबणार नाही, त्याकरिता खंबीरपणे काम करा, संविधान तुम्हाला अभय देईल.
शाहू , फुले, आंबेडकर यांचा विचार देशाला तारेला असेही त्या म्हणाल्या.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक भाषण मुख्य संयोजक डॉ.अरुण शिरसाट यांनी केले, याप्रसंगी शहराध्यक्ष शेख युसूफ लीडर, ऍड.इकबालसिंग गिल, माजी जिल्हाध्यक्ष इब्राहिम पठाण यांची प्रमुख उपस्थिती होती.पाहुण्यांचा परिचय प्रा.शिलवंत गोपणारायन यांनी करून दिला, सूत्रसंचालन डॉ.मिलिंद आठवले तर आभार प्रदर्शन प्रा.सोनाजी गवई यांनी केले. यावेळी रेखाताई राऊत महिला शहराध्यक्ष, अनिस पटेल, सरोज मसलगे पाटील, हेमाताई पाटील, अंजलीताई बांगर, अनिता भंडारी, उज्वला ताई दत्त,आनंद भामरे, उमाकांत खोतकर,मंजू लोखंडे, रवी लोखंडे, किशोर सरोदे, राहुल शिरसाट, अशोक चक्रे दादा, गणेश शिंदे, दीपक पाईकराव, पी बी खोतकर,शिरीष चव्हाण,शकुंतला साबळे, रंजना हिवराळे आदी पदाधिकारी व मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या.
No comments:
Post a Comment