बार्टी संस्थेत जागतिक महिला दिन उत्साहात साजरा - Middlepathnews

लाइव न्यूज़

Wednesday 8 March 2023

बार्टी संस्थेत जागतिक महिला दिन उत्साहात साजरा

पुणे :

 डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी), पुणे येथे बुधवार दि. ८ मार्च २०२३ रोजी जागतिक महिला दिन मोठया उत्साहाने साजरा करण्यात आला. भारतीय संविधानाचे निर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर, राजमाता जिजाऊ, सावित्रीबाई फुले, महामाता रमाबाई आंबेडकर यांच्या प्रतिमेस मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. 

श्रीमती. इंदिरा अस्वार, निबंधक बार्टी, विभागप्रमुख श्रीमती नंदिनी आवडे, श्रीमती स्नेहल भोसले, श्रीमती वृषाली शिंदे, डॉ. सत्येंद्रनाथ चव्हाण, श्री. रविंद्र कदम, श्री. अनिल कारंडे, श्री. राजेंद्र बरकडे, लेखाधिकारी, कार्यालय अधीक्षक श्रीमती प्रज्ञा मोहिते, डॉ. संध्या नारखेडे, सुभेदार सचिन जगदाळे आदी मान्यवर उपस्थित होते.

 निसर्गोपचार तज्ञ डॉ. ज्योती कुंभार यांनी आरोग्यासाठी आवश्यक व दैनंदिन जीवनात आहार कसा व कोणता घ्यावा या विषयी मार्गदर्शन केले. डॉ. चव्हाण यांनी शुभेच्छा देऊन राजमाता जिजाऊने शिवरायांना घडविले सावित्रीमाईच्या संघर्षामुळे महिला आज राष्ट्रपतीपदी विराजमान झाल्या असून रमाईच्या त्यागामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर या देशाचे संविधान लिहून या देशातील जनेतला न्याय दिला व हिंदु कोड बिलाद्वारे महिलांना समानतेचे अधिकार बहाल केले. त्यामुळेच आज महिला प्रत्येक क्षेत्रात पुढे येत असल्याचे सांगितले.

 श्रीमती. इंदिरा अस्वार, वृषाली शिंदे, नंदिनी आवडे, मा. कारंडे यांनी जागतिक महिला दिनानिमित्त मनोगत व्यक्त करुन शुभेच्छा दिल्या. बार्टी संस्थेच्या निबंधक श्रीमती इंदिरा अस्वार यांना सत्यशोधक मुक्ता साळवे समाजभुषण पुरस्कार मिळाल्याबद्दल तसेच मा. कारंडे सर यांची बार्टीत विभाग प्रमुख पदी निवड झाल्याबद्दल त्यांना पुष्पगुच्छ भेट देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी बार्टी संस्थेतील अधिकारी व कर्मचारी उपस्थितीत होते. सुत्रसंचलन श्रीमती संध्या नारखेडे यांनी केले. आभार जागृती गायकवाड यांनी मानले.

No comments:

Post a Comment

Pages