औरंगाबाद :
रिपब्लिकन विद्यार्थी सेना,पँथर्स रिपब्लिकन विद्यार्थी आघाडीच्या वतीने सचिन निकम व गुणरत्न सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली किलेअर्क येथील 1000 मुलांच्या वसतिगृहातील समस्या तात्काळ सोडविण्याच्या मागणीसाठी निवेदन देऊन लक्ष वेधण्यात आले होते त्यानुसार प्रादेशिक उपायुक्त जयश्री सोनकवडे यांनी त्यांच्या दालनात विद्यार्थी संघटना,विद्यार्थी,ठेकेदार, गृहपाल व संबंधित लेखा विभागाच्या कर्मचाऱ्यांची संयुक्त बैठक घेऊन युनिट निहाय समस्या जाणून घेतल्या व वसतिगृहातील समस्या प्राधान्याने सोडवा अन्यथा कारवाईला सामोरे जा असा इशारा देत विविध प्रश्न मार्गी लावण्यासाठी निर्देश दिले.
त्यानुसार भोजन ठेकेदार,गृहपाल,स्वच्छता ठेकेदार यांना जाब विचारत तात्काळ सुधारणा करून 2 दिवसात अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत.
वसतिगृहातील पिण्याच्या व वापरण्याच्या पाण्याची समस्या मार्गी लावणार,लवकरच युनिट निहाय टीव्ही,पाण्याची नळ जोडणी, नादुरुस्त वायरिंग ह्या समस्या सुटण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
वसतिगृह महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे नाव वसतिगृह देण्याच्या मागणीचा प्रस्ताव तात्काळ समाजकल्याण आयुक्त यांना पाठविण्यात आला आहे.
बैठकीस सचिन निकम,गुणरत्न सोनवणे,रोहन वाकळे, निलेश वाघमारे, विश्वजित गायकवाड, लक्ष्मण डोईफोडे, संदिप सरोदे, विशाल पडघन, आशिष जाधव, नितीन पाईकराव, शुभम नेतने, नयन पवार, सुयोग बनसोडे, राहुल कदम, अक्षय भाग्यवंत, अजय दांडगे, मुकुंद भुक्तर, सुबोध खंदारे, विवेक खंदारे, हर्षवर्धन घनसावध, श्याम साळवे, आकाश बनकर, भावेश कोळसे आदींसह मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.
तर सहाय्यक आयुक्त श्री.वाबळे,गृहपाल होर्शीळ,पवार यांची उपस्थिती होती.
No comments:
Post a Comment