विद्यापीठ वृत्तपत्रविद्या विभागात संशोधनास गाईड मिळेना ; संशोधक विद्यार्थी हैराण राष्ट्रवादीचे कुलगुरूंना निवेदन - Middlepathnews

लाइव न्यूज़

Saturday 4 March 2023

विद्यापीठ वृत्तपत्रविद्या विभागात संशोधनास गाईड मिळेना ; संशोधक विद्यार्थी हैराण राष्ट्रवादीचे कुलगुरूंना निवेदन


 औरंगाबाद :

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या जनसंवाद व वृत्तपत्रविद्या विभागातील अधीछात्रवृत्तीधारक एम. फिल पूर्ण केलेल्या संशोधक विद्यार्थ्यांना पीएच.डी. सलग करण्यासाठी संशोधन मार्गदर्शक मिळत नसल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याची तक्रार कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांच्याकडे राष्ट्रवादीने निवेदनाद्वारे केली आहे. 

 

सारथी, महाज्योती, बार्टी, राजीव गांधी, मौलाना आझाद अशा फेलोशिप एम.फिल पूर्ण केलेल्या संशोधक विद्यार्थ्यांना कनिष्ठ ते वरिष्ठ संशोधन अधिछात्रवृत्ती (JRF ते SRF) सलग करण्यासाठी जनसंवाद व वृत्तपत्रविद्या विभागात संशोधक मार्गदर्शक उपलब्ध नाही यामुळे 25 विद्यार्थ्यांचे यामध्ये मोठ्या प्रमाणात शैक्षणिक नुकसान होत आहे.


लिबरल आर्ट, ताराबाई शिंदे स्त्री अभ्यास केंद्र, पाली अँड बुद्धिजम, ग्रंथालय शास्त्र विभागाच्या आंतरविद्याशाखेच्या धर्तीवर जनसंवाद व वृत्तपत्रविद्या विभागातील विद्यार्थ्यांना संशोधन गाईड उपलब्ध करून देण्यात यावे अशी मागणी  अधिसभा सदस्य नरेंद्र काळे, भारत खैरनार, राष्ट्रवादी युवक प्रदेश कार्यकारणी सदस्य दादाराव कांबळे व अल्पसंख्याक शहर उपाध्यक्ष इजाज बेग यांनी निवेदनात कुलगुरूंकडे केली आहे.

No comments:

Post a Comment

Pages