नवीन शैक्षणिक धोरण आणि प्राध्यापकांच्या मूलभूत प्रश्नांवर सुसंवाद आवश्यक- नवनिर्वाचित व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ.सुर्यकांत जोगदंड - Middlepathnews

लाइव न्यूज़

Sunday 5 March 2023

नवीन शैक्षणिक धोरण आणि प्राध्यापकांच्या मूलभूत प्रश्नांवर सुसंवाद आवश्यक- नवनिर्वाचित व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ.सुर्यकांत जोगदंड

 नांदेड,(प्रतिनिधी)- आगामी काळात देशभरात यूजीसी मार्फत लागू होणाऱ्या नवीन शैक्षणिक धोरणांचा महाविद्यालयाने आपापल्या स्तरावर परामर्श घेणे आवश्यक आहे तसेच महाविद्यालयातील प्राध्यापकांची मूलभूत प्रश्न याविषयी सुसंवाद असणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे नवनिर्वाचित सदस्य डॉ. सूर्यकांत जोगदंड यांनी केले. वसंतराव नाईक महाविद्यालयात प्राचार्य डॉ .शेखर घुंगरवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेच्या सदस्य पदी नवनिर्वाचित झाल्याबद्दल महाविद्यालयाच्या वतीने सूर्यकांत जोगदंड यांचा यावेळी हृद्य सत्कार करण्यात आला. डॉ सूर्यकांत जोगदंड यांनी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापकांशी यावेळी हितगुज साधले. प्राध्यापकांच्या समस्याविषयी यापुढे विद्यापीठात प्रश्न मांडण्याचे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले.  उपप्राचार्य डॉ. व्ही. आर. राठोड, कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. एन. पी.दिंडे यांची प्रमुख उपस्थिती होती.   प्राचार्य डॉ. शेखर घुंगरवार यांनी अध्यक्षीय समारोप केला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. नागेश कांबळे यांनी तर आभार प्रदर्शन डॉ. साहेबराव मोरे यांनी केले. या कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील डॉ. पंडित चव्हाण, डॉ. प्रदीप बिरादार, डॉ. जी. वेणुगोपाल, डॉ. अनिल गच्चे, डॉ. गणेश लिंगमपल्ले, डॉ. उत्तम कानवटे ,डॉ. एम के झरे डॉ.व्यंकटेश देशमुख, डॉ. आर. एम. कागणे ,डॉ. सुनिता गरुड, डॉ. संजय गिरे, डॉ.साहेबराव शिंदे, डॉ. विजयकुमार मोरे यांसह महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक शिक्षकेतर कर्मचारी यांची उपस्थिती होती.

No comments:

Post a Comment

Pages