"मराठी क्रीडा पत्रकारितेचे जनक वि. वि.करमरकर यांचे निधन" - Middlepathnews

लाइव न्यूज़

Sunday 5 March 2023

"मराठी क्रीडा पत्रकारितेचे जनक वि. वि.करमरकर यांचे निधन"



मुंबई :                                                                    

मराठी दैनिकांमध्ये खेळांच्या बातम्यांना प्रमुख स्थान करमरकर यांनी मिळवून दिले.यासाठी एक पूर्ण पान तयार करून खेळांची आवड असणाऱ्या वाचकांची भूक त्यामधून त्यांनी पूर्ण केली होती,मराठी दैनिकात सर्वात प्रथम क्रीडा पान सुरू करून देशी,विदेशी खेळांना मानाचे पान देणारे आणि म्हणूनच ‘क्रीडा पानाचे जनक’ म्हणून त्यांना ओळखले जाते.माजी क्रीडा संपादक,लेखक,समीक्षक आणि लोकप्रिय समालोचक वि. वि. करमरकर यांचे सोमवारी सकाळी अंधेरी येथे निधन झाले. ते ८५ वर्षांचे होते. त्यांच्या निधनाने राज्यातील क्रीडा क्षेत्राचा आणि खेळाडूंचा ज्येष्ठ मार्गदर्शक हरपल्याची भावना व्यक्त केली जात आहे.

      १९६२ मध्ये महाराष्ट्र टाइम्स सुरू झाल्यानंतर या दैनिकाच्या पहिल्या टीममध्ये करमरकर यांचा सहभाग होता. द्वा. भ. कर्णिक  संपादक असलेल्या या दैनिकात सुरुवातीला आधी दोन कॉलममध्ये क्रीडा जगताच्या बातम्या येत असत.


*मराठी दैनिकांच्या विश्वात पहिला प्रयोग!*


करमरकर यांच्या सततच्या प्रयत्नांमुळे कालांतराने संपूर्ण पान खेळांच्या पानाला मिळाले. संपूर्ण मराठी दैनिकांच्या जगतात हा प्रयोग पहिल्यांदा झाला आणि वाचकांनी त्याला प्रचंड प्रतिसाद मिळाला. नंतर राज्यात इतर दैनिकांनीसुद्धा एक पूर्ण पान खेळांच्या बातम्यांना देण्याचा निर्णय घेतला. यामुळे खेळांची आवड असणाऱ्या पत्रकारांना यामुळे पूर्ण वेळ नोकऱ्या उपलब्ध झाल्या. परिणामी खेळ, खेळाडू, संस्था, क्रीडा संघटक आणि कार्यकर्ते यांच्या सततच्या प्रयत्नांची धडपड ठळकपणे लोकांसमोर आली. या सर्वांचे निर्माते करमरकर असल्याने ते क्रीडा पानाचे जनक म्हणून ओळखले गेले. विशेष म्हणजे मटाचे क्रीडा पान त्यांनी इतके लोकप्रिय केले की पहिल्या पानावर एक नजर टाकली की वाचक थेट मागच्या खेळांच्या पानावर जात. आपली आवड पूर्ण झाली की मग आतल्या पानावर नजर टाकत. राज्यभरातल्या वाचकांच्या सर्वेक्षणामधून ही बाब ठळकपणे समोर आली होती.



No comments:

Post a Comment

Pages