किनवट शहरात मोकाट मनोरुग्णामुळे भितीचे वातावरण - Middlepathnews

लाइव न्यूज़

Monday 6 March 2023

किनवट शहरात मोकाट मनोरुग्णामुळे भितीचे वातावरण

 


किनवट ता. प्र. :-

किनवट येथे दोन चार दिवसांपासून एक वेडसर अनोळखी मनोरुग्ण सध्या चर्चेचा विषय ठरला आहे कारण एक अनोळखी वेडसर इसम किनवट शहरात फिरत आहे तो मनोरुग्ण लहान मुले मुली स्त्रिया यांना दगडाने , हाताने मारत आहे तसेच अश्लील चाळे करत आहे दिनांक ४ रोजी तो महात्मा फुले चौकात एका महीलेस  मारहाण केली तसेच एका चिमुकलीस दगडाने मारले तिला पाच ते सहा टाके पडले तसेच व्यापाऱ्यांना त्रास देत आहे . गटारातील पाणी पित आहे व घाणेरडा प्रकार करत आहे त्यामुळे किनवट येथील नागरिकात भितीचे वातावरण पसरले आहे.

या बाबीने त्रस्त होऊन किनवट येथील नागरीकांनी पोलीस स्टेशनला एक निवेदन दिले आहे

या निवेदनावर आकाश आळणे, सुगत नगराळे, सतीश कापसे, संघर्ष घुले, ब्रम्हानंद एडके, निखील सर्पे, सुभाष मुंडे, आकाश बसवते, गौतम पाटील, स्वप्नील सर्पे, सुमेध कापसे, आकाश सर्पे, अनील कांबळे, ज्ञानेश्वर मुनेश्वर, सचिन ठोंबरे, अनात्मा कयापाक, रुपेश सामशेटवार, अक्रम, रायेज शेख, राजु भरणे, प्रशांत ठमके, गणेश आमले, ओमकार नारायण, सलीम खान , रईज खान, शेख मोहसीन, ए. व्यंकटेश, फायेम शेख, रामलु नरसीमलु, अविनाश पवार, कामेश मुनेश्वर, केतन भरणे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

No comments:

Post a Comment

Pages