जाती अंताची लढाई स्वतःच्या घरापासून अगोदर करावी तरच जातीभेद नाहीसा होतो - डॉ. हर्षवर्धन दवणे - Middlepathnews

लाइव न्यूज़

Wednesday 26 April 2023

जाती अंताची लढाई स्वतःच्या घरापासून अगोदर करावी तरच जातीभेद नाहीसा होतो - डॉ. हर्षवर्धन दवणे

 


नांदेड :  मौजे कल्हाळ ता. जि. नांदेड येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132 वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. सकाळी 10.00 वाजता प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते पंचरंगी व निळ्या ध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले. जयंती महोत्सवाचे प्रमुख वक्ते म्हणून डॉ हर्षवर्धन दवणे (राष्ट्रीय अध्यक्ष NSOSYF) व स्वप्नील नरबाग (फुले-शाहू-आंबेडकर युवा मंच) यांची उपस्थिती होती. डॉ हर्षवर्धन दवणे यांनी आपल्या भाषणातून शिक्षणाचे महत्त्व किती आहे व तेच आपले भांडवल आहे यादृष्टीने त्याकडे पाहायला सांगितले. याकरिता महिलांची जबाबदारी फार महत्त्वाची आहे, महिला ह्या संस्कार पेरणाऱ्या प्रथम गुरू आहेत त्यामुळे त्यांनी सर्व बाजूने सशक्त होणं गरजेचं आहे. जर भगवान गौतम बुद्धांचा संदेश दूरवर पसरायचा असेल तर डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्वप्नातील भारत बौद्धमय झाला पाहिजे. त्यासाठी सर्वप्रथम जातीव्यवस्था नष्ट झाली पाहिजे. जे बौद्ध झाले आहेत त्यांनी सर्वप्रथम जात आपल्यातून काढली पाहिजे तरच इतर परिवर्तनवादी लोक बौद्ध धम्माकडे वळतील. बौद्धांनी आपापल्यातील जाती उपजाती बाजूला ठेवून विवाह केले पाहिजे. तरच खऱ्या अर्थाने बौद्ध म्हणून घेण्यास आपण लायक असू असे त्यांनी आपल्या भाषणातून मत व्यक्त केले. दुसरे प्रमुख वक्ते म्हणून मा.स्वप्नील नरबाग यांनी समयोचीत आपले मनोगत व्यक्त केले. जयवंता आठवले यांनी आभार व्यक्त केले.

No comments:

Post a Comment

Pages