संभाजीनगर :
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३२व्या जयंती निमित्त छत्रपती संभाजीनगर शहरात "Run For Equality" मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
समाजामध्ये प्रस्थापित जातीभेदाच्या मानसिकतेला व सामाजिक अन्यायाला आळा घालण्यासाठी सर्वांनी एकत्रित यावे म्हणून ही मॅरेथॉन आयोजित करण्यात आली आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महान लेखनापैकी "अनहीलेशन ऑफ कास्ट" या त्यांच्या सर्वोत्तम साहित्याची प्रेरणाज्योत घेऊन जाती तोडण्याचे व जाती नष्ट करण्याचा संदेश या मॅरेथॉन मधून देण्यात येणार आहे.
१४ एप्रिल रोजी पहाटे ५:५० वाजता ही मॅरेथॉन डॉ. बाबासाहेब आंबेडकर कला व वाणिज्य महाविद्यालयाचे मैदान, नागसेनवन येथून सुरू होईल. मागील ५ वर्षांपासून या मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे. स्पर्धेत सहभाग घेण्यासाठी www.runforequality.org या संकेतस्थळावर नोंदणी करावी. नोंदणी झालेल्या स्पर्धकांना बीब नंबर चे वाटप पी.ई.एस. पॉलिटेक्निक कॉलेज येथे दिनांक १३ एप्रिल रोजी दु. २ ते ४ च्या दरम्यान करण्यात येईल. सहभागीना एक वही एक पेन नोंदणी शुल्क म्हणून देण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
5 किमी व 10 किमी अशी अश्या दोन टप्प्यात मॅरेथॉन होईल. समारोप डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ होईल. पहिल्या ३ विजेत्यांना रोख बक्षीसे व 'अनहीलेशन ऑफ कास्ट' या ग्रंथाची प्रत दिली जाणार असल्याची माहिती आयोजन समितीचे सदस्य डॉ. मनीषा अंभोरे व इंजि. अविनाश कांबळे यांनी यावेळी दिली.
No comments:
Post a Comment