नांदेड ( प्रतिनिधी ) येथील महात्मा फुले हायस्कूल नाईक नगर नांदेड येथील शाळेत दिनांक 14 एप्रिल 2023 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून सकाळी ठीक 8 वाजता अभिवादन व व्याख्यान घेण्यात येणार आहे. इयत्ता 5 वी ते 10 वी इयत्तेतील शिक्षण घेणार्या सर्व विद्यार्थ्यांकडून सर्व विषयांतील शालेय चित्रकला व निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या कार्यक्रमास शालेय शिक्षण समितीचे अध्यक्ष माननीय अमोलभाऊ केंद्रे साहेब उपस्थित राहणार आहेत. प्रमुख पाहुणे म्हणून वानखेडे होस्टेल चे संचालक प्रा.आर.बी.वानखेडे सर , संत तुकामाई होस्टेल चे संचालक प्रा. डी.एन.काळे सर , संचालक प्रा. येवतीकर सर ,संचालक ऑडहोकेट लोणे साहेब, प्रा.गणेश शिंदे सर , सर्वज्ञ स्वप्नपूर्ती होस्टेल चे संचालक प्रा.मारोतराव लटपटे सर , बंजारा हॉस्टेलचे संचालक श्री संतोष राठोड सर, प्रा.हिप्परगेकर सर यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. सदरील कार्यक्रमात प्राथमिक शाळेतील व हायस्कूल मधील सहभागी विद्यार्थ्यांना प्रथम क्रमांक व द्वितीय क्रमांक मिळवणारे विद्यार्थ्यांना प्रोत्साहनपर बक्षीस व प्रशस्तीपत्र पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.परिसरातील नागरिक , पालक व विद्यार्थ्यी यांनी प्रदर्शनात सहभागी व्हावेत असे आवाहन शाळेतील मुख्याध्यापक श्री भारत कलवले सर, एस.के.केंद्रे सर व संयोजन समितीच्या वतीने करण्यात आले आहे.
No comments:
Post a Comment