लग्नाआधी परीक्षेचे कर्तव्य - Middlepathnews

लाइव न्यूज़

Thursday 13 April 2023

लग्नाआधी परीक्षेचे कर्तव्य

कल्याण :

जीवनदीप महाविद्यालय गोवेली येथे सुरू असलेल्या मुंबई विद्यापीठाच्या सहाव्या सत्राची परीक्षा होत असताना महाविद्यालयातील अर्थशास्त्र विभागातील विद्यार्थिनी अश्विनी अभिमन्यू मस्कर या विद्यार्थिनीचा एकाच दिवशी विवाह सोहळा व परीक्षेचा पेपर असल्याने या विद्यार्थिनीने 'आधी लगीन कोंढाण्याचं मग माझ्या रायबाचं' या उदाहरणाप्रमाणे दुपारी पेपर देऊन सायंकाळी आपला विवाह पार पाडला विद्यार्थी दशेतील आपल्या कर्तव्याला प्राधान्य देणाऱ्या या विद्यार्थीनीचे कौतुक करावे तेवढे कमी आहे .याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष श्री रविंद्र घोडविंदे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.के.बी कोरे उपप्राचार्य हरेंद्र सोष्टे तसेच प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी तिचे भरभरून कौतुक केले आहे व भावी आयुष्यास शुभेच्छा दिल्या आहे.

No comments:

Post a Comment

Pages