अर्थशास्त्रज्ञ डॉ. बाबासाहेब आंबेडकर - राजेश पाटिल - Middlepathnews

लाइव न्यूज़

Saturday 1 April 2023

अर्थशास्त्रज्ञ डॉ. बाबासाहेब आंबेडकर - राजेश पाटिल

             डॉ . भीमराव रामजी आबेंडकर हे एकच नाव अवघ्या विश्वाला व्यापून उरणारे आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी खऱ्या अर्थाने समाजाच्या विकासाला चालना दिली आधीचा काळ पाहिल्यास वर्णव्यवस्था अस्तित्वात होती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लहान असताना अनेक संकटांना त्यांना तोंड द्यावे लागले अस्पृश्यतेचे चटके बाबासाहेबांना लहान पणापासुनच सोसावे लागले बाबासाहेब जेव्हां लहान होते तेंव्हा गाडीवान त्यांना गाडीतुन उतरण्यास सांगीतले तेव्हां बाबासाहेबांना म्हणजेच छोटया भीवाला मनाला वेगळेच वाटले तेव्हांपासुन  त्यांना

अस्पृष्यतेबद्दल घृणा वाटू लागली कधी काळी महाराच्या गळ्यात असणारे खापराचे गाडगे , मडके, पाठीला सदैव असणारा झाडू व अवहेलना बाबासाहेबांच्या विचारांनी बाबासाहेबांच्या चळवळीनीं पुसुन टाकली आज ताठ मानेने समाज सुटाबुटात , टायकोटात वावरतांना दिसतो हे उपकार हे ऋण बाबासाहेबांचे कोणत्याच

जन्मात फिटणार नाही बाबासाहेब जेव्हां व्हाईसरॉयच्या काळात मजुरमंत्री होते तेव्हां त्यांनी अनेक शोषीत पिडीत कामगार मजुरांचे प्रश्न , स्त्रियांचे प्रश्न मार्गी लावले भारतातील अनेक औद्योगिक विकासाची कामे शेती करीता पाण्याचे व्यवस्थापन , विज निर्मिती, पाटबंधारे, वाहतुक आणि तंत्रज्ञान असे महत्वाचे विभाग त्यांनी सांभाळले सेट्रंल वॉटर कमीशन, सेंट्रल इलेक्ट्री सिटी अॅथोरीटी, सेट्रंल इरीगेशन अॅन्ड नेव्हीगेशन कमीशन , फायनान्स कमीशन, लेबर कमीशन , नॅशनल थर्मल पॉवर कमीशन दामोदर व्हॅली , कॉर्पोरेशन , भाक्रा नांगल प्रकल्प हे सर्व उपक्रम बाबासाहेबांची कर्तत्व सांगणारी कार्य होत .

हे प्रशासकीय निर्णय बाबासाहेबांनी १९४३ साली स्वता : निर्णय घेवुन ठरवीले तसेच केंद्र सरकारमध्ये असतांना श्रम , जल, विद्युतमंत्री असतांना  हिराकुड, दामोदर आणि सोन नद्यावरील  धरणाचे नियोजन त्यांनी याच काळात केल.

अर्थशास्त्र या विषयातील जगातील सर्वोच्च समजल्या जाणाऱ्या डॉक्टर ऑफ सायन्स( डी .एस .सी .) या पदवीने ते सन्मानित झाले .

अंनत हाल अपेष्टा सोसुन प्रॉब्लेम ऑफ दि रुपी हा प्रबंधन १९२३ साली तयार केला .

आज जी भारतीय रिझर्व बँक उभी आहे त्यात बाबासाहेबांचा सिहांचा वाटा आहे .

डी .एसस्सी. हि पदवी मिळवणारे डॉ . बाबासाहेब आंबेडकर हे उपखंडातील एकमेव व्यक्ती होत.त्यांनी त्यात भारतीय चलनापासुन ते द्विधातु चलन , चांदि चलन पद्धती, चांदि प्रमाण , सुवर्ण प्रमाण, रूपयांचा तुटवडा इतर देशातील चलनांशी तुलना, मीठ एक्साईज ड्युटी, कस्टम ड्युटी , डॉलर, पौंड, आर्थिक मंदि, तेजी या बद्दल अभ्यास पुर्ण मत या ग्रंथात मांडले तसेच भारतीय राज्य घटनेच्या माध्यमातुन त्यांनी अनेक घटनात्मक अधिकार , मुलभूत हक्क, नागरिकांचे अधिकार , कर्तव्य देशाच्या प्रगती करीता लोकांना समर्पित केले .

देशातील संतुलन तसेच सार्वभौमत्व , लोकशाहि हि संविधानीक शक्ती महासत्ता म्हणुन वाटचाल करत आहे पत्रकार, कायदेतज्ञ, इतिहास तज्ञ, राज्य शास्त्रज्ञ, अर्थतज्ञ, जलतज्ञ, समाजशास्त्रज्ञ, राष्ट्र निर्माते विश्वरत्न डॉ . बाबासाहेब आबेंडकर यांना कोटी कोटी विनम्र अभिवादन !


✍🏻राजेश पाटिल

सिध्दार्थ नगर किनवट

मो .९७६७७७३३४०

No comments:

Post a Comment

Pages