किनवट येथे महात्मा बसवेश्वरांची जयंती हर्षोल्हासात साजरी - Middlepathnews

लाइव न्यूज़

Monday 24 April 2023

किनवट येथे महात्मा बसवेश्वरांची जयंती हर्षोल्हासात साजरी

किनवट  (प्रतिनिधी) : १२ व्या शतकातील भारताच्या धार्मिक, सांस्कृतिक, साहित्यिक, शैक्षणिक, राजकीय व सामाजिक जीवनातील ज्येष्ठ समाज परिवर्तनवादी युगपुरुष, एक महान तत्त्वज्ञानी, समाजप्रबोधक, प्रसिद्ध कवी महात्मा बसवेश्वर महाराज यांची जयंती शनिवारी (दि.22) किनवट येथील महात्मा बसवेश्वर चौकात हर्षोल्हासात साजरी करण्यात आली.


      प्रारंभी महात्मा बसवेश्वरांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण केल्यानंतर, आमदार भीमराव केराम यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी बोलतांना आ.केराम म्हणाले की, महात्मा बसवेश्वरांनी जातीपातीच्या भिंती गाडून तत्कालीन समाजव्यवस्थेला एक वेगळीच ओळख दिली. त्यांनी शोषणविरोधी, भेदभावविरोधी, जातीभेदाविरोधी, श्रेष्ठ-कनिष्ठ विरोधी समतेची लढाई नुसती लढलीच नाही तर ती यशस्वीसुद्धा करून दाखवली. दरम्यान भाजपा युवा नेते सतीश बिराजदार यांनी म.बसवेश्वरांचे जीवन चरित्र व कार्याविषयी थोडक्यात माहिती दिली. यावेळी भाजपाचे ज्येष्ठ नेते राघू मामा, माजी नगराध्यक्ष आनंद मच्छेवार, भाजपा ता.अध्यक्ष संदीप केंद्रे, माजी प्राचार्य वि.मा.शिंदे,  माजी नगराध्यक्ष व्यंकटराव नेम्मानीवार, के.मूर्ती, नारायणराव सिडाम, माजी उपनगराध्यक्ष अजय चाडावार, आनंद भालेराव, प्रल्हाद भंडारे, नागनाथ भंडारे, लक्ष्मीपती दोनपेल्लीवार, चंद्रकांत भंडारे, अरूण भंडारे, अनिल भंडारे, संजय बिराजदार, चंद्रकांत भंडारे, प्रल्हाद भंडारे, विश्वनाथ भंडारे, संजय बिराजदार, राजेंद्र वड्डे, चंद्रशेखर व्यवहारे, बालाजी धोतरे, विजय भंडारे, विजय महाजन, योगेश बिराजदार, मारुती गाढवे, किशन राकोंडे, राजाराम राईकवाडे, संतोष ठोंबरे, बबन राकोंडे, संजय भालके आदी समाज बांधवांची उपस्थिती होती.

No comments:

Post a Comment

Pages