जयवर्धन भोसीकर
हैद्राबाद :
भारत राष्ट्र समिती पक्षाची घोडदौड महाराष्ट्रात वेगाने चालू आहे. बि. आर. एस. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा मुख्यमंत्री तेलंगणा राज्य के. चंद्रशेखर राव ह्यांच्या हस्ते आज बीड जिल्ह्याचे मराठा नेते व बीड नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष दिलीप अण्णा गोरे व ऊसतोड कामगार संघटनेचे प्रदेश अध्यक्ष प्रा. शिवराज बांगर पाटील ह्यांचा आज हैद्राबाद येथे प्रगती भवन येथे प्रवेश झाला
या पक्षप्रवेश सोहळ्यानिमित्ताने मुख्यमंत्री के.सी.आर. यांनी जवळपास तीन तास वेळ दिलीप अण्णा गोरे व प्राध्यापक शिवराज बांगर पाटील यांना दिला व ते म्हणाले की बीड जिल्ह्यातील लाखो शेतकऱ्यांना भारत राष्ट्र समिती या पक्षांमध्ये सामील करा मी बीड जिल्ह्यापर्यंत तुम्हाला तेलंगणातून पाणी आणून देतो व जवळपास 400 टीएमसी पाणी बीड जिल्ह्यात पोहोचवण्यासाठी संपूर्ण ताकत लावतो असे वचन त्यांनी दिले.
महाराष्ट्रातील सर्वात मागासलेला जिल्हा म्हणून बीड जिल्हा ओळखला जातो या जिल्ह्यांमध्ये रेल्वे नाही, या जिल्ह्यांमध्ये विमानतळ नाही, या जिल्ह्यामध्ये शहरात उच्च दर्जाचे मेडिकल कॉलेज नाही यावर सुद्धा त्यांनी भाष्य केले
महाराष्ट्रातील ऊसतोड कामगारांचे मोठे प्रश्न आपण मार्गी लावू शकतो भारत राष्ट्र समितीची सरकार येत्या काळात महाराष्ट्र मध्ये येणार आहे व शेतकऱ्यांच्या संपूर्ण विकासासाठी भारत राष्ट्र समिती चे सर्व लोकप्रतिनिधी काम करणार आहेत, तेलंगणामध्ये राबवल्या जाणाऱ्या सर्व योजना या महाराष्ट्रामध्ये राबवल्या जातील असे वचन सुद्धा त्यांनी दिले.
या पक्षप्रवेश सोहळ्यात दिलीप अण्णा गोरे व प्राध्यापक शिवराज बांगर यांच्यासोबत मराठवाड्याचे पक्ष निरीक्षक तथा आरमूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार जीवन अण्णा रेड्डी व भारत राष्ट्र समितीचे महाराष्ट्राचे नेते तथा कन्नड विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव, भारत राष्ट्र समितीचे युवा नेते प्रवीण अण्णा जेठेवाड, दिग्विजय गोरे, अशोक पांढरे ,रामप्रसाद कोल्हे, विलास नवले, दलित नेते अविनाश प्रघानेन, आदित्यवर्धन जाधव आदींची उपस्थिती होती.
महाराष्ट्रातून जवळपास एक कोटी युवकांनी भारत राष्ट्र समिती पक्षांमध्ये आगामी काळात प्रवेश करण्यासाठी युवा नेत्यांनी सज्ज राहावं व भारत राष्ट्र समिती पक्षांमध्ये सामील होऊन महाराष्ट्रामध्ये मोठी लोक चळवळ शेतकरी हितासाठी राबवावी असे मनोगत के.सी.आर यांनी व्यक्त केली.
देश स्वतंत्र होऊन आज 75 वर्षे झाले जवळपास महाराष्ट्रातील 20000 टीएमसी पाणी हे समुद्रामध्ये जाते. आपण नदीजोड प्रकल्प राबवू शकलो नाही व शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पाणी पोहोचू शकलो नाही, शेतकऱ्यांना वीज मोफत देऊ शकलो नाही, शेतकऱ्यांचा मोफत विमा महाराष्ट्रात काढू शकलो नाही, याबद्दल वेदना सुद्धा त्यांनी व्यक्त केल्या.
छत्रपती संभाजी नगर (औरंगाबाद ) येथे येत्या काळात दोन लाख लोकांची विराट सभा व पक्षप्रवेश सोहळा घेणार असल्याचे के.सी.आर साहेबांनी सांगितले. मराठवाड्याचा व विदर्भाचा संपूर्ण विकास करण्यासाठी महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी बी.आर. एस पार्टी काम करेल, असे केसीआर म्हणाले.
महाराष्ट्रात येत्या काळात 288 विधानसभा मतदारसंघांमध्ये भारत राष्ट्र समितीचे प्रचार रथ जातील व जवळपास दोन कोटी कार्यकर्त्यांना पक्षांमध्ये प्रवेश देतील असेही केसीआर साहेब म्हणाले
प्राध्यापक शिवराज बांगर यांनी ऊसतोड कामगारांच्या ज्वलंत प्रश्न संदर्भात केसीआर साहेबांशी चर्चा केली. शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी बांगर यांच्यासोबत बी आर एस पार्टी राहील असे वचन मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव साहेबांनी दिले.
No comments:
Post a Comment