जीवनदीप महाविद्यालयात पथनाट्याच्या माध्यमातून जनजागृती - Middlepathnews

लाइव न्यूज़

Saturday 1 April 2023

जीवनदीप महाविद्यालयात पथनाट्याच्या माध्यमातून जनजागृती

कल्याण :

जीवनदीप महाविद्यालयात नेहरू युवा केंद्र ठाणे व महाराष्ट्र युवा संघ कल्याण यांच्या संयुक्त विद्यमाने शेजार युवा सांसद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी महाविद्यालय ते गोवेली गावापर्यंत युवा रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीच्या माध्यमातून पथनाट्याद्वारे एचआयव्ही एड्स विषयी जनजागृती करण्यात आली. तसेच सकस आहार घेण्यासाठी जनजागृती करण्यात आली. यावेळी मुरबाड येथील एचआयव्ही एड्स प्रतिबंधक व सामान्य कक्षच्या समुपदेशक अर्चना भालेराव यांनी एचआयव्ही एड्स विषयक समज-गैरसमज याविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. तसेच मिलिंद धारवाडकर यांनी जी-20 वाय-20ची संकल्पना स्पष्ट केली.


या कार्यक्रमप्रसंगी जीवनदीप शैक्षणिक संस्थेकडून ग्रामीण भागातील युवा सरपंचांचा सत्कार करण्यात आला. यामध्ये दहागावचे अरविंद मिरकुटे, जांभूळचे परिक्षित रसाळ, घोटसईचे सुयोग मगर, मामणोलीचे तुषार कोर, केळणी कोलमचे राजेश भोईर, दहिवलीचे कमलाकर राऊत यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नरेश टेंभे यांनी केले तर अजित कारभारी यांनी उपस्थितांचे आभार मानले.


यावेळी जिल्हा युवा अधिकारी निशांत रौतेला, अजित कारभारी, जीवनदीप संस्थेचे अध्यक्ष रविंद्र घोडविंदे, संचालक प्रशांत घोडविंदे, प्राचार्य डॉ.के.बी.कोरे, डॉ. शंकर मुंडे, कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य प्रकाश रोहणे, कमलादेवी महाविद्यालय विठ्ठलवाडीचे एनएसएस प्रमुख अरुण काळे, नेहरू युवा केंद्र ठाणेचे सुनील गमरे प्राध्यापक वर्ग व मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Pages