बार्टीने निवड केलेल्या ८६१ पात्र संशोधक विद्यार्थी फेलोशिप अवॉर्डसाठी आता आरपार ची लढाई लढणार - राजेंद्र पातोडे - Middlepathnews

लाइव न्यूज़

Monday 3 April 2023

बार्टीने निवड केलेल्या ८६१ पात्र संशोधक विद्यार्थी फेलोशिप अवॉर्डसाठी आता आरपार ची लढाई लढणार - राजेंद्र पातोडे

मुंबई,  : डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय संशोधन अधिछात्रवृत्ती BAN - २०२१ अंतर्गत बार्टी नियामक मंडळाच्या व महासंचालक ह्यांचे मान्यतेने दिनांक १ फेब्रुवारी २०२३ नुसार सचिव सामाजिक न्याय विभागास दिलेल्या निवडसूची नुसार ८६१ विद्यार्थी पात्र करण्यात आले आहेत.ह्या ८६१ पात्र विध्यार्थ्यांना फेलोशिप अवॉर्ड करण्यासाठी आता आरपारची लढाई लढून ही फेलोशिप अवॉर्ड ८६१ विद्यार्थ्यांना मिळवून देण्यासाठी लवकरच युवा आघाडी राज्यपाल आणि बाळासाहेब आंबेडकर ह्यांना मुख्यमंत्री सोबत बोलून मार्गी लावू असा शब्द वंचित बहूजन युवा आघाडी प्रदेश महासचिव राजेंद्र पातोडे ह्यांनी संशोधक विद्यार्थी कृती समितीचे पदाधिकारी ह्यांना दिला ह्यावेळी भारिप बमसंचे प्रदेश अध्यक्ष अशोकभाऊ सोनोने प्रामुख्याने उपस्थित होते.

एकूण सर्व ८६१ पात्र विद्यार्थ्यांना अधिछात्रवृत्ती देण्याबाबत आदेश लवकरात लवकर निर्गमित करावे, ह्या बाबत स्नेहल भोसले, विभागप्रमुख योजना विभाग, डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन आणि प्रशिक्षण संस्था, बार्टी पुणे ह्यांनी सामाजिक न्याय विभागाला दिले आहे.त्यासाठी ३२ व्या बैठकीमध्ये विषय क्र. ७ च्य मान्यतेनुसार एकूण २०० विद्यार्थ्यांना सदर अधिछात्रवृत्तीचा लाभ देण्यास मान्यता मिळाली होती ती केवळ २०० विद्यार्थ्यांची सूची ग्राह्य न धरता ८६१ विद्यार्थी बार्टी द्वारे पात्र करण्यात आले आहे.मात्र सामाजिक न्याय विभागाचा भ्रष्ट आणि जातीयवादी सचिव सुमित भांगे हा जाणीवपूर्वक ह्या पात्र ८६१ विद्यार्थी ह्यांना वेठीस धरत आहे.वंचित बहूजन युवा आघाडी लवकरच भांगे च्या भानगडी बाहेर काढून त्याचा समाचार घेतील.

निवडसूची नुसार पात्र ८६१ विद्यार्थ्यांना फेलोशिप अवॉर्ड करण्याच्या दृष्टीने ह्या विषयावर युवा आघाडीचे  शिष्टमंडळ राज्यपाल ह्यांना भेटतील.तसेच एड बाळासाहेब आंबेडकर हे मुख्यमंत्री ह्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सोबत बोलून हा विषय मार्गी लावण्यासाठी आरपार ची लढाई सुरू केली असून सरकार बधले नाही तर  प्रसंगी उच्च न्यायालयात याचिका करून सर्व निवड झालेल्या ८६१ पात्र विध्यार्थ्यांना लाभ मिळवून देण्याचे अभिवचन राजेंद्र पातोडे ह्यांनी दिले आहे.

No comments:

Post a Comment

Pages