आमदार विक्रम काळे यांच्या स्थानिक निधीतून किनवट-माहूर तालुक्यातील 73 शाळांना ग्रंथांचे वितरण - Middlepathnews

लाइव न्यूज़

Monday 3 April 2023

आमदार विक्रम काळे यांच्या स्थानिक निधीतून किनवट-माहूर तालुक्यातील 73 शाळांना ग्रंथांचे वितरण

किनवट,दि.03 (प्रतिनिधी) :  मराठवाडयातील शिक्षक मतदारसंघाचे आमदार विक्रम काळे यांनी आपल्या स्थानिक  निधीतून  किनवट आणि माहूर  तालूक्यातील  माध्यमिक  व उच्च माध्यमिक  आदिवासी  आश्रम शाळा  व वरिष्ठ महाविद्यालये मिळून एकूण 73 शाळांमध्ये विविध विषयावरील पुस्तकांचे वितरण केले. सदरील कार्यक्रम येथील पंचायत समितीच्या सभागृहात बुधवारी (दि.29) पार पडला.  कार्यक्रमाच्या  अध्यक्षस्थानी  माजी आमदार  प्रदीप नाईक होते सोबतच महाविकास आघाडीतील अनेक पदाधिकार्‍यांची  उपस्थिती होती


  गटविकास अधिकारी  पुरूषोत्तम  वैष्णव, गटशिक्षणाधिकारी ज्ञानोबा बने, संस्थाध्यक्ष  अ‍ॅड. सचिन  राठोड, आर.आर.जाधव (गशिअ माहूर), राजेंद्र  केशवे, मुख्याध्यापक संघ किनवटचे सचिव अरविंद राठोड, नरसिंग  नेम्मानीवार, रमेश  राऊलवार, कृष्णा नेम्मानीवार, प्रा. गव्हाणे , प्रा. भगवान जोगदंड, सुरेश सोळंके पाटील,  प्रा. विजय खुपसे,  माजी नगराध्यक्ष साजिद खान, संजय सिडाम, वैजनाथ करपुडे पाटील,अनिल पाटील कर्‍हाळे, कचरु जोशी, विनायक  गव्हाणे यांच्यासह दोन्ही तालुक्यातून  आलेले मुख्याध्यापक  व नागरीक  मोठया संख्येने  या कार्यक्रमास उपस्थित होते.


     या प्रसंगी आ.विक्रम काळे यांनी बोलतांना सांगितले की, आपण निवडून आल्यापासून  आजपर्यत  दोन महिण्यामध्ये  राज्यातील  विनाअनुदानीत  शाळांच्या  अनुदानासाठी  रूपये 1 हजार 160 कोटी  रुपये राज्य सरकार कडून मंजूर करून घेतले आहेत. त्याच बरोबर  शिक्षण सेवकांच्या मानधनात  वाढ करून घेतलेली आहे. तसेच तासिका तत्वावर काम करणार्‍या  प्राध्यापकांच्या मानधनात  वाढ करून  घेतल्याची माहिती त्यांनी दिली.  यापुढे शिक्षकांच्या  वैद्यकीय देयकांसाठी  3 लाख रुपयांपर्यतचा अधिकार  शिक्षणाधिकार्‍यांना  आणि रूपये 5 लाख रुपयांपर्यतचे  बिल मंजूर करण्याचा अधिकार शिक्षण उपसंचालकांना   असणार आहे. तशी तरतूद मी मंजूर करून  घेतली आहे.  शिक्षक कर्मचार्‍यांची  जुन्या पेन्शनसाठी  आग्रही भूमिका  असल्याचे त्यांनी सांगितले. पुढील काळात  हा लढा तीव्र करून जुनी पेन्शन योजने सर्व लाभ प्राप्त करून घेतले जातील, असे आश्वासन आ.विक्रम काळे यांनी दिले.


     किनवट -माहूर तालुक्यातील 73 शाळांना आपल्या आमदार निधीतून   ग्रंथ वाटप करण्यामागचा मुख्य हेतू  विद्यार्थ्याचे ज्ञान  वृद्धींगत करणे असून,  मुलांची वाचनातील गोडी  वाढविण्यासाठी   शिक्षकांनीसुद्धा कसून प्रयत्न करावेत. तसेच  ही पुस्तके  शिक्षकांना सुध्दा  वाचण्यासाठी  द्यावेत, अशी विनंती त्यांनी उपस्थित मुख्याध्यापकांना केली. कार्यक्रमाचे  सूत्रसंचालन  उत्तम कानिंदे यांनी केले तर प्रास्ताविक  ज्ञानोबा बने (ग.शि.अ. किनवट) यांनी केले होते.

No comments:

Post a Comment

Pages