राहुल सांस्कृतीयाय त्यांचा जन्म उत्तर प्रदेशातील कन्नोला ( आझमगढ ) येथे ब्राह्मण कुटूंबात ९ एप्रिल १८९३ रोजी झाला ...तर त्यांचे निधन १४ एप्रिल १९६३ रोजी झाले ... ते जागतिक कीर्तीचे भारतीय महापंडित आणि लेखक होते ... त्यांचे मूळ नाव केदारनाथ तर कुलनाम पांडे. माता पिता कुलवंती आणि गोवर्धन. बौद्ध धर्माची दिक्षा घेतल्यानंतर केदारनाथांनी राहूल सांस्कृत्यायन हे नाव धारण केले याच नावाने ते प्रख्यात झाले... वयाच्या पंधराव्या वर्षी उर्दू मिडल स्कूल परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर ते घरातून पळून गेले... वयाच्या अकराव्या वर्षीच त्यांचा विवाह झाला होता पण हा अजाणतेपणी झालेला विवाह म्हणून त्यांनी त्याचे बंधन मानले नाही. .. अठराव्या वर्षी ते वाराणसीला गेले आणि तेथे त्यांनी संस्कृत आणि भारतीय तत्त्वज्ञानाचं अध्ययन केले ... त्यांना केवळ विद्वत्ता नको होती, तर साधू व्हायचे होते... त्यांची विरक्त वृत्ती पाहून छप्रा गावच्या एका महंताने त्यांना वैष्णव धर्माची दीक्षा देऊन त्यांचे पंथीय नाव ‘रामोदार साधू’ असे ठेवले... काही काळ तेथील मठपती म्हणूनही त्यांनी काम पाहिले... नंतर ते छाप्रा गाव सोडून ते भारताच्या तीर्थयात्रेस गेले.
- यशवंत भंडारे
No comments:
Post a Comment