बार्टी च्या वतीने देण्यात येणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय संशोधन अधिछात्रवृत्ती (BANRF2021)अंतर्गत सर्व पात्र 861 विध्यार्थ्यांना तात्काळ फेलोशिप मंजूर करा -संशोधक विध्यार्थी आंदोलन समन्वयक समर्थन समिती - Middlepathnews

लाइव न्यूज़

Saturday 8 April 2023

बार्टी च्या वतीने देण्यात येणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय संशोधन अधिछात्रवृत्ती (BANRF2021)अंतर्गत सर्व पात्र 861 विध्यार्थ्यांना तात्काळ फेलोशिप मंजूर करा -संशोधक विध्यार्थी आंदोलन समन्वयक समर्थन समिती

मुंबई :

डॉ.बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय संशोधन आधीछात्रवृत्ति(BANRF-2021) अंतर्गत सर्व पात्र 861 विद्यार्थ्यांना तात्काळ सरसकट फेलोशिप मंजूर करण्याबाबत तसेच निवड झालेल्या सर्व संशोधक विद्यार्थ्यांना तात्काळ अवार्ड लेटर देण्याच्या मागणीसाठी आजाद मैदान येथे दि. 20 फेब्रुवारी पासून "बेमुदत धरणे आंदोलन" सुरू आहे आणि या आंदोलनाला सर्व सामाजिक संस्था/संघटना तसेच सर्व समविचारी राजकिय पक्षांचा सक्रिय पाठींबा आहे.

गेल्या ५० दिवसापासून विद्यार्थी आझाद मैदानात आपले गाव,घर सोडून बेमुदत धरणे आंदोलन करीत आहे,  सरकार/मा. मुख्यमंत्री,मा. उपमुख्यमंत्री भेट नाकारत आहे,मंत्रालयातील कुठलाही अधिकारी अजूनही विध्यार्थ्यांना भेटायला आलेले नसून या आंदोलनाची दखल सुद्धा घेतलेली नाही या सरंजामी भूमिकेचा सर्व सामाजिक/राजकीय संघटना,कर्मचारी संघटना राजकिय पक्ष जाहीर निषेध करत  १२ एप्रिल २०२३ ला संपूर्ण  महाराष्ट्र राज्यातून स्थानिक मंडळ, जयंती उत्सव कमिट्या तसेच सर्व समविचारी राजकीय पक्ष,स्थानिक मंडळ आणि सर्वसामान्य कार्यकर्ते आजाद मैदानात धरणे आंदोलनात सहभागी होत  जाहीर पाठींबा दिला असून सक्रिय सहभाग असणार आहे..!या सरकारला सर्वसामान्य जनतेच्या,विद्यार्थ्यांच्या, बेरोजगारांच्या प्रश्नांवर गंभीर नाही हे वारंवार सिद्ध झाले आहे आणि आता हे सर्वसामान्य जनतेच्या मूलभूत गरजांना दुर्लक्ष करून सरकार राज्यात सावरकर गौरव यात्रा काढत आहे. १४ एप्रिल डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती च्या पूर्वी जर सरकारने बार्टी च्या विद्यार्थ्यांना सरसकट (८६१) फेलोशिप आणि अवार्ड लेटर दिले नाहीतर याच्या निषेधार्थ राज्यभरातून सरकारची प्रेत यात्रा काढणार आणि बहुजन समाजाला आव्हान आहे की महाराष्ट्रा मध्ये १४ एप्रिल रोजी भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सवात अनुसूचित जाती-जमाती चे प्रतिनिधित्व करणारे,नगरसेवक, आमदार, खासदार तथा BJP, शेंदे गटातील लोकप्रतिनिधी यांना आमंत्रण देऊ नये ज्या ज्या ठिकाणी हे लोकप्रतिनिधी दिसतील त्या ठिकाणी यांचा निषेध करावा लागेल .

मागण्या   खालीलप्रमाणे


■  कुणबी- मराठा समाजासाठीची 'सारथी' आणि ओबीसींसाठीची म्हाज्योति संशोधकांना सरसकट फेलोशिप देऊ शकते. या औदार्याचा आम्हाला आनंदच वाटत असून राज्य सरकारचे त्याबद्दल आम्ही अभिनंदनच करतो. मग दलितांच्या 'बार्टी' लाच २०० विद्यार्थ्यांची मर्यादा  कशासाठी?


■    शिंदे- फडणवीस सरकारने हा आपपरभाव  - दुजाभाव  येत्या १४ एप्रिलआधी दूर करावा.


■   अनुसूचित जातींच्या संशोधकांनाही सरसकट फेलोशिपची 'जयंती भेट' द्यावी.


■  अनावश्यक उपक्रमांवर बार्टी करत असलेल्या उधळपट्टीला लगाम घालावा.


■   दलित संशोधकांना बदनाम करण्याऐवजी स्वतःच्या  कुटुंब कल्याणासाठी कोणत्या अधिकाऱ्यांनी  बार्टीच्या  निधीवर हात मारला, याचा राज्य सरकारने आधी तपास करावा!


१४ एप्रिल रोजी भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३२ व्या जयंतीनिमित्त खालील मागण्या मान्य न करता जर मुख्यमंत्री/उपमुख्यमंत्री  चैत्यभूमी इथे अभिवादनासाठी येत असला तर डॉ .बाबासाहेब आंबेडकर यांचे अनुयायी या सरकारचा जाहीर निषेध केल्याशिवाय राहणार नाही असा इशारा 

 भीम आर्मी, ISRA , जागृत भारतीय संघ ,Ambedkarite Action Committee (AAC), मी बुद्धिस्ट फाउंडेशन , महाराष्ट्र सामाजिक परिवर्तन परिषद ,फेस अॉफ आंबेडकराईट मुव्हमेंट ( फॕम ),भारतीय लोकसत्ताक संघटना ,युवक पँथर,मातंग समाज सेवा संघ, आंबेडकरी क्रांती दल (आक्रांद), कुणबी समाजोन्नती संघ संलग्न कुणबी महिला मंडळ,सिंधुदूर्ग जिल्हा बौद्ध सेवा संघ मुंबई,  डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया,  बौद्ध संघर्ष समीती, महाराष्ट्र , सत्यशोधक बहुजन आघाडी,  भारतीय समता संघ, महाराष्ट्र ,  रिपब्लिकन बहुजन आघाडी, महाराष्ट्,  रिपब्लिकन पाॅलिटीकल फ्रेन्डशीप फ्रन्ट, महाराष्ट्र ,  विद्रोही आंबेडकरी जलसा, महाराष्ट्र , रिपब्लिकन मजदूर संघ, महाराष्ट्र ,मानवहीत लोकशाही पक्ष , बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थी संघटना, नागपूर,  डाॅ. बाबासाहेब आंबेडकर पोस्ट ग्रेजुएट स्टूडेंट् असोसिएशन, पुणे,  सत्यशोधक विद्यार्थी संघटना, महाराष्ट्र ,  सिनेट परिवर्तन पॅनल, नागपूर ,  अभ्यासिका विद्यार्थी कृती समीती, जनांदोलनाचा राष्ट्रीय समन्वय- महाराष्ट्र,   मानवी हक्क अभियान, संविधान सैनिक संघ ,संविधान विद्यार्थी सेना, समता सैनिक दल , केंद्रीय संघटक-सुनिल सारीपुत्त, सम्यक मैत्री संघ, तथागत बहुउद्देशीय संघ,रिपब्लिकन पार्टी आँफ इंडीया(RK) ,भारतीय लोकसत्ताक विद्यार्थी संघट,कोकण युवा आज मुंबई येथील पत्रकार परिषदेत दिला .

No comments:

Post a Comment

Pages