डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती दिनी डॉ. सुनील अवचार यांच्या हस्ते समता आर्ट फेस्टिव्हल चे उद्घाटन - Middlepathnews

लाइव न्यूज़

Friday 7 April 2023

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती दिनी डॉ. सुनील अवचार यांच्या हस्ते समता आर्ट फेस्टिव्हल चे उद्घाटन

मुंबई : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३२ व्या जयंती निम्मित भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक व सांस्कृतिक मंडळ, खांदा कॉलनी, पनवेल यांच्या विद्यमाने 'समता आर्ट फेस्टिव्हल' चे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्ताने १४ ते १६ एप्रिल रोजी भव्य असे कलाप्रदर्शन असणार आहे. 


या कलाप्रदर्शनाचे आकर्षण म्हणजे त्याचे उद्घाटन मुंबई विद्यापीठात प्राध्यापक म्हणून कार्यरत असलेले चित्रकार, कवी डॉ. सुनील अभिमान अवचार यांच्या हस्ते होणार आहे. समकाळातील एक महत्त्वाचे कवी आणि चित्रकार म्हणून त्यांची ख्याती सर्वदूर पसरली आहे. केवळ भारतातच नव्हे तर अमेरिका सारख्या देशातही त्यांच्या चित्रांचे प्रदर्शन लागले आहे. 


तरी पनवेल आणि आजूबाजूच्या परिसरात राहणाऱ्या नागरिकांनी या 'समता आर्ट फेस्टिव्हल' ला नक्कीच भेट द्यावी. व कलाप्रदर्शनाचा आस्वाद घ्यावा.

No comments:

Post a Comment

Pages