किनवट,ता.५ :शहर व परिसरात आज(ता.५) बुद्ध पौर्णिमा उत्साहात साजरी करण्यात आली.पोर्णिमेचा मुख्य सोहळा सिद्धार्थ नगरातील जेतवन बुद्ध विहारात संपन्न झाला.यावेळी मातोश्री महाथेरी शासन पुर्णा यांनी धम्मवंदना घेतली.
फुले - आंबेडकर संयुक्त जयंती उत्सव समिती,विशाखा महीला मंडळ , सिद्धार्थ नगर युवक मंडळाच्या वतीने पोर्णिमेनिमित्त खिर व भोजनदान करण्यात आले.याप्रसंगी प्रविण गायकवाड, संयुक्त जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष अॅड.सम्राट सर्पे,यादव नगारे, गंगाधर कावळे,अॅड.मिलिंद सर्पे, निखिल कावळे,प्रतिक नगराळे,निवेदक कानिंदे, रामकिशन सोनकांबळे,सुधाताई परेकार, सुमित्रा कावळे,धुरपता मुनेश्वर,मालाभाई नगारे,विजयमाला आळणे,शशिकला कावळे,ललिता मुनेश्वर, गंगुबाई परेकार,गौतम पाटील,सतिश कापसे,प्रशिक मुनेश्वर,आकाश आळणे,राजेश पाटील, सुबोध परेकार,सुगत भरणे,सुगत नगराळे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संयुक्त जयंती उत्सव समितीचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी पुढाकार घेतला.
No comments:
Post a Comment