राज्यस्तरीय धम्मरत्न पुरस्काराने भारत वानखेडे तर भालेराव व गजभारे यांचा समाजरत्न पुरस्काराने सन्मान ; तुफान पावसाच्या तडाख्यात "बुध्द पहाट"ला जमली अलोट गर्दी - Middlepathnews

लाइव न्यूज़

Friday 5 May 2023

राज्यस्तरीय धम्मरत्न पुरस्काराने भारत वानखेडे तर भालेराव व गजभारे यांचा समाजरत्न पुरस्काराने सन्मान ; तुफान पावसाच्या तडाख्यात "बुध्द पहाट"ला जमली अलोट गर्दीनांदेड विशेष प्रतिनिधी :

 जयवर्धन भोसीकर

आकस्मिक होत असलेल्या तुफान पावसाच्या तडाख्याला न जुमानता चौदा वर्षांची धम्म परंपरा असलेल्या "बुध्द पहाट"या अभिनव बुध्द जयंतीच्या पारंपारिक सोहळ्यास नांदेडकरांनी अलोट गर्दी करुन पावसाच्या या तुफानावर मात करण्यात बुद्ध व डॉ आंबेडकर यांच्या विचारांचे वादळ आज निर्माण केले

 

येथील डॉ.शंकरराव चव्हाण प्रेक्षागृहात दरवर्षी प्रमाणे तथागत गौतम बुद्ध यांच्या जयंती दिनी १५ व्या बुध्द पहाट या ऐतिहासिक सांस्कृतिक अभिवादन सोहळ्याचे  डॉ बाबासाहेब आंबेडकर सोशल अँड कल्चरल मुहमेंट निर्मित प्रमोदकुमार गजभारे प्रस्तुत बुध्दपहाट कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.या सोहळ्यात आज मंत्रालयीन कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष भारत वानखेडे यांचा राज्यस्तरीय धम्मरत्न तर पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे प्रदेशाध्यक्ष माजी नगरसेवक बापुराव गजभारे व सेवानिवृत्त उपविभागीय अभियंता डी.डी.भालेराव यांचा समाजरत्न पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आले आहे.


यावेळी प्रमुख अतिथी म्हणुन  पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे,आ.बालाजी कल्याणकर,मंत्रालयीन अधिकारी कर्मचारी संघटनेचे नेते भारतजी वानखेडे,नवी मुंबई सिडकोच्या अधिकारी सौ.सविता शिंदे,विजय नांदेकर, बापुराव गजभारे,युवा नेते रवी गायकवाड, डाॅ.करुणा जमदाडे, डाॅ.उत्तम सोनकाबंळ आदी मान्यवर उपस्थित होते.


यावेळी मान्यवरांच्या हस्ते सर्वप्रथम भगवान बुध्द,डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून वंदना पठण करण्यात आली.उपस्थित मान्यवर पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे, कर्मचारी नेते भारत वानखेडे, बापुराव गजभारे, डॉ.करुणा जमदाडे यांनी जयंती निमित्त धम्मबांधवांना शुभेच्छा देऊन बुध्द डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या  जीवनचरित्रावर विचार व्यक्त केले.

मुख्य संगीतीक कार्यक्रमात महाराष्ट्रातील प्रख्यात बुद्ध-भीम गीत गझल गायक राहुल देव कदम, प्रख्यात गायिका संगीता भावसार,नामदेव इंगळे,श्रीरंग चिंतेवार यांनी गायलेल्या एकापेक्षा एक सरस सुमधुर गीत सादर करुन रसिक श्रोत्यांची दाद मिळवली, ज्येष्ठ पत्रकार रविन्द्र केसकर यांच्या अभ्यासपुर्ण निवेदनाने रसिक प्रेक्षकांच्या टाळ्यांचा पाऊस पाडला कार्य क्रमास रसिक प्रेक्षकांनी मोठी दाद देत उदंड प्रतिसाद दिला यावेळी संगीत साथ सुरेख बासरी वादन शेख ऐनोदिन वारसी,तबला शिध्दोधन कदम,सुदाम गुनाले, किबोर्ड सिध्दार्थ सुर्यवंशी,महेन्द्र कदम,अॅक्टोपॅड राजेश भावसार,रतन चित्ते,यांनी संगीत साथ केलीकार्यक्रमाचे प्रास्ताविक व  टी.पी.वाघमारे यांनी केले तर सुत्रसंचलन सुभाष लोणे यांनी करुन आभार मानले.


कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी 

निर्माता प्रमोदकुमार  गजभारे,संयोजन समिती अध्यक्ष रोहिदास कांबळे, मार्गदर्शक जेष्ठ पत्रकार प्रकाश कांबळे, सुभाष लोणे,उपाध्यक्ष आर. बी. मादळे,सचिव  टी.पी. वाघमारे,सहसचिव दिनेश सूर्यवंशी,कोषाध्यक्ष इंजि. भरत कुमार कानिंदे,

संघटक यशवंत कांबळे,सदस्य नंदकुमार कांबळे सिंदगीकर,उज्वला सुर्यवंशी (ऐडके),डी.एल. भिसे,बी.आर. धनजकर, वसंत दिग्रसकर,पंडीत आढाव, धर्मेन्द्र कांबळे, देविदास ढवळे,राजकुमार स्वामी, संजय रत्नपारखी ,भगवान गायकवाड, गजानंन कानडे,संघरत्न कोकरे,संजय बुक्तरे,अरुण केसराळीकर,बालाजी कांबळे, नागोराव ढवळे,दिलीप हनुमंते,प्रा.शुध्दोधन गायकवाड,प्रा.डॉ. जे.टी.जाधव,इंजि.वसंत वीर आदी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.

No comments:

Post a Comment

Pages