छत्रपती संभाजी महाराजांची जयंती उत्साहात साजरी - Middlepathnews

लाइव न्यूज़

Monday 15 May 2023

छत्रपती संभाजी महाराजांची जयंती उत्साहात साजरी

किनवट : स्वराज्यरक्षक, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांची यांची जयंती रविवारी (दि.14)शहरातील सरस्वती विद्या मंदिर परिसरातील संभाजी राजे चौकात उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी आमदार भीमराव केराम यांच्यासह जमलेल्या सर्व शंभूप्रेमींनी  छत्रपती संभाजी राजेंच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.


  या निमित्ताने बोलतांना आ.केराम म्हणाले की, छत्रपती संभाजी महाराजांची संपूर्ण कारकीर्द तेजोमय होती. अगदी लहान असल्यापासून त्यांच्यावर अनेक संकटे आली. त्या संकटांवर पाय रोऊन उभे न राहता संभाजी महाराजांनी समर्थपणे उत्तुंग अशी झेपही घेतली. छत्रपती शिवाजी महाराजांनंतर स्वराज्याची धुरा सक्षमपणे आपल्या हातात घेऊन संपूर्ण हिंदुस्थानाला तोंडात बोटे घालायला लावणारा प्रचंड पराक्रम संभाजी महाराजांनी केला. छत्रपती शिवाजी महाराजांबरोबर किंवा त्यानंतरही अनेक मोहिमा संभाजी राजेंनी यशस्वीपणे राबवल्या. कोणत्याही मोहिमेत त्यांना कधीच अपयश आले नाही. छत्रपती संभाजी महाराजांना टक्कर देईल, असा योद्धा तत्कालीन हिंदुस्थानात नव्हता. संभाजी राजे हे असामान्य व्यक्तिमत्त्व होते. अचाट धैर्य, अजोड पराक्रम, असमान्य शौर्य, प्रयत्नांची पराकाष्ठा, अनेक भाषांवर प्रभुत्व, संस्कृत पंडित, धर्माभिमानी, व्यासंगी, आदर्श महावीर, समाजकारण, राजकारण, अर्थकारण, धर्मकारण अशा अनेक क्षेत्रात त्यांनी आपले निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले होते.


    या प्रसंगी भाजपाचे तालुकाध्यक्ष संदीप केंद्रे, माजी नगराध्यक्ष आनंद मच्छेवार, शहराध्यक्ष श्रीनिवास नेम्मानीवार, अनिल तिरमनवार, मारोती भरकड, स्वागत आयनेनीवार, संजय सिरमनवार, दगडू भरकड, शिवा आंधळे, विवेक केंद्रे, संतोष डोणगे, अजय कदम, अश्विन पवार, संतोष मरस्कोल्हे यांचेसह इतर मान्यवर उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Pages