महात्मा फुले हायस्कूल नाईकनगर येथील शाळेत दीक्षान्त समारोह कार्यक्रम संपन्न - Middlepathnews

लाइव न्यूज़

Monday 1 May 2023

महात्मा फुले हायस्कूल नाईकनगर येथील शाळेत दीक्षान्त समारोह कार्यक्रम संपन्न

 नांदेड ( प्रतिनिधी )येथील महात्मा  फुले हायस्कूल नाईक नगर नांदेड येथील शाळेत शनिवार दिनांक 29 एप्रिल 2023 रोजी इयत्ता 5 वी ते इयत्ता 9 वी च्या विद्यार्थ्यांचा वार्षिक निकाल जाहीर करण्यात आला. सर्वप्रथम राष्ट्रपिता महात्मा फुले यांच्या  प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.त्यानंतर इयत्ता 9 वी इयत्तेतील उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा ऑपरोन वेश परिधान करून प्रमुख पाहुणे यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र, प्रगतिपत्रक देऊन सन्मानित करण्याचा दीक्षान्त समारोह कार्यक्रम घेण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. एस.पी. डांगे  यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक एम.एन.गुंटूरकर  यांनी केले.या कार्यक्रमास अध्यक्ष म्हणून माननीय मुख्याध्यापक श्री भारत कलवले, प्रमुख वक्ते म्हणून  प्रा.सी. एल.कदम, मुख्याध्यापक श्री.एस. केंद्रे. प्रा.डी.एन काळे साहेब, पाटील गर्ल्स होस्टेल च्या संचालक सौ. स्वाती गजानन पाटील मॅडम यांची प्रमुख उपस्थिती होती. परिसरातील नागरिक सर्व विद्यार्थ्यी सकाळी  शालेय गणवेश परिधान करून कार्यक्रमास उपस्थित होते.कार्यक्रम यशस्वी करण्यात श्री.व्ही.एम.खवास पाटील ,सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारीवर्ग यांनी सहकार्य केल्याबद्दल श्री.एस.एस.सुंदाळे  यांनी आभार प्रदर्शन केले. 

No comments:

Post a Comment

Pages