किनवट(प्रतिनिधी) : तालुका कृषी कार्यालयाच्यावतीने तालुक्यातील मौजे कोल्हारी येथे गुरूवारी (दि.01) कृषी दिन साजरा करण्यात आला.
या प्रसंगी शेतीमध्ये उत्कृष्ट कार्य करणाऱ्या शेतकरी महिला व पुरुष बांधवांचे पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. या निमित्ताने पावसाने खंड दिलेल्या कालावधीत पिकांसाठी करावयाच्या उपाययोजना, आयपीएम, आयएनएम, पीक विमा योजना, म.ग्रा.रोजगार हमी योजनेंतर्गत फळबाग लागवड, तृणधान्य पिकाखालील क्षेत्र वाढविणे, पी.एम.किसान योजना, केवायसी आदी विषयांवर चर्चा करण्यात आली. तसेच कृषी दिनाचे औचित्य साधून शेतकऱ्यांच्या बांधांवर वृक्ष लागवड करण्यात आली. सदरील कार्यक्रमाचे आयोजन व सूत्रसंचालन कृषी सहाय्यक एस.एम.चात्रे यांनी केले. या वेळी प्रकाश करेवाड, मारोती बलपलवाड, राम डंके यांचेसह गावातील प्रतिष्ठित नागरिक, शेतकरी बांधव व महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
No comments:
Post a Comment