भारतीय बौद्ध महासभा तालुका शाखा किनवट च्या वतीने तालुका स्तरीय चिंतन शिबीर संपन्न - Middlepathnews

लाइव न्यूज़

Monday 31 July 2023

भारतीय बौद्ध महासभा तालुका शाखा किनवट च्या वतीने तालुका स्तरीय चिंतन शिबीर संपन्न


 किनवट: (ता.३०) प्रतिनिधी :

     जिल्हा शाखा नांदेडच्या आदेशानुसार भारतीय बौद्ध महासभा तालुका शाखा किनवट च्या वतीने महात्मा ज्योतिबा फुले विद्यालय गोकुंदा येथे (ता.३०) तालुका स्तरीय चिंतन शिबीर तालुका अध्यक्ष अभियंता प्रशांत ठमके यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आले.प्रारंभी प्रतिमा पुजन  करून वंदना घेऊन दिप प्रज्वलनाने उद्घाटन करण्यात आले.यावेळी केंद्रीय शिक्षक तथा बौद्धाचार्य माधवराव सर्पे  तसेच इंजि.सिद्धार्थ पाटील यांनी उपस्थित तालुक्यातील तालुका शाखा, वार्ड शाखा, ग्रामशाखा पदाधिकारी यांना दोन सत्रात 1.प्रबोधनाची आचार संहिता,2बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया अर्थात धम्मक्रांती गतिमान करणे,3.शाखांचा हिशोब कसा ठेवावा,4.सभासद नोंदणी अभियान या विषयावर सविस्तर मार्गदर्शन केले. यावेळी आयु.महेंद्र नरवाडे जिल्हा पर्यटन उपाध्यक्ष, राहुल उमरे केंद्रीय शिक्षक यांची प्रमुख उपस्थिती होती.सहभागी पदाधिकारी यांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र वाटप करण्यात आले.कार्यक्रमाचे सुत्रसंचलन तालुका संस्कार सचिव अनिल उमरे यांनी केले तर तालुका सरचिटणीस प्राचार्य राजाराम वाघमारे यांनी उपस्थितांचे आभार मानले. शिबिरासाठी मोठ्या संख्येने तालुका शाखा,वार्ड शाखा, ग्रामशाखा पदाधिकारी उपासक उपासिका उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Pages