किनवट,ता.१४ : तालुक्यात बुधवारी(ता.१२) सर्वदूर मध्यम स्वरूपाचा समाधानकारक पाऊस पडलेला आहे.यामुळे उरल्या-सुरल्या खरीप पेरण्या वेगाने पूर्ण केल्या जात आहेत. तालुक्यातील नऊ महसूल मंडळात बरसलेला एकूण पाऊस ३०९.६ मि.मी. असून, त्याची सरासरी ३४.४ मिलिमीटर आहे.
प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्र,मुंबई यांनी नांदेड जिल्ह्यासाठी ता.११ व १२ या दोन दिवसांसाठी ‘येलो अलर्ट’ जारी केला होता. त्यानुसार सर्वत्र मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पडला असून, केवळ माहूर तालुक्यातील वानोळा व सिंदखेड या दोन मंडळात अतिवृष्टी झालेली आहे.
गुरूवारी सकाळी संपलेल्या गत २४ तासात तालुक्यातील पावसाची नोंद पुढील प्रमाणे असून, कंसात १ जूनपासून आजपर्यंत झालेल्या मंडळनिहाय एकूण पावसाची नोंद दिलेली आहे. किनवट- ४३.८ (१८६.१ मि.मी.); बोधडी- १०.३(१६३.२ मि.मी.); इस्लापूर- २४.० (२७२.४ मि.मी.); जलधरा- १७.८ (१७९.७ मि.मी.); शिवणी- २९.३(१७१.८ मि.मी.); मांडवी- ४७.८(२०८.८ मि.मी.); दहेली- ४०.० (३४७.२ मि.मी.), सिंदगी मो. ४८.८ (२२०.९ मि.मी.); उमरी बाजार ४७.८ (२५१.० मि.मी.).
तालुक्यात एक जूनपासून नऊ मंडळात मिळून आजपर्यंतचा पडलेला एकूण पाऊस २,००१.१ मि.मी.असून, त्याची सरासरी २२२.३४ मि.मी.येते. आतापर्यंत तालुक्यात सर्वाधिक पाऊस दहेली मंडळात झाला असून, सर्वात कमी बोधडी मंडळात झालेला आहे. तालुक्यात गुरूवार (ता.१३) पर्यंत पडणारा अपेक्षित सरासरी पाऊस ३१४.१ मि.मी.असून, त्या तुलनेत ७०.७ टक्के पाऊस पडलेला आहे.१ जून ते ३१ ऑक्टोबर दरम्यान तालुक्यात पडणारा वार्षिक पाऊस १०२६.५८ मि.मी.असून, या तुलनेत आतापर्यंत तालुक्यात २१.६३ टक्के पाऊस पडलेला आहे. नदी,नाले थोडेफार वाहते झाले असून, विंधनविहिरींतील पाण्याची पातळी मात्र अजून वाढलेली नाही. गत वर्षी ५७१.६ मि.मी.पाऊस पडला होता. आज रोजी पर्यंत पडणार्या अपेक्षित सरासरी पावसाच्या तुलनेत त्याची टक्केवारी १८१.९८ एवढी होती.
No comments:
Post a Comment