कै.शंकरराव चव्हाण यांच्या जयंती निमित्त रक्तदान शिबिर : आरोग्य सल्लागार सौ सविता कांबळे करतात चार वर्षांपासून रक्तदान - Middlepathnews

लाइव न्यूज़

Friday 14 July 2023

कै.शंकरराव चव्हाण यांच्या जयंती निमित्त रक्तदान शिबिर : आरोग्य सल्लागार सौ सविता कांबळे करतात चार वर्षांपासून रक्तदान

जयवर्धन भोसीकर

विशेष प्रतिनिधी नांदेड :

    देशाचे माजी गृहमंत्री मराठवाड्याचे भगीरथ, जलनायक कै.डॉ. शंकरराव चव्हाण यांच्या जयंती निमित्त काँग्रेस च्या वतीने दि १४ जुलै रोजी नगर परिषद कार्यालयामध्ये रक्तदान शिबीर संपन्न झाले. यावेळी कै. चव्हाण यांच्या कार्यावरील डॉक्युमेंट्री दाखविण्यात आली. दर वर्षी प्रमाणे यंदाच्या चौथ्या वर्षी देशमुख नगर येथिल रहिवासी असलेल्या पत्रकार राजेंद्र कांबळे यांच्या सौभाग्यवती आरोग्य सल्लागार सौ.सविता राजेंद्र कांबळे यांनी सलग चार वर्षापासून रक्तदान करुण डॉ.शंकरराव चव्हाण यांना खर्या अर्थाने आदरांजली अर्पण करीत आहेत. त्यांची  प्रशंसा होत आहे. 

   काँग्रेस  वतीने नगर परिषद कार्यालयात रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते होते.सर्वप्रथम कै.शंकरराव चव्हाण यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालुन अभिवादन करण्यात आले.तदनंतर शंकरराव चव्हाण यांच्या कार्यकाळात झालेल्या विष्णुपुरी प्रकल्पाची तसेच परिसरातील भौगोलिक परिस्थितीची माहिती असलेली चित्रफीत मोठ्या पडद्यावर दाखवण्यात आली त्या नंतर रक्तदानाला सुरुवात झाली.या रक्तदान शिबीरामध्ये कॉग्रेस कार्यकर्त्यांनी रक्तदान केले.आरोग्य सल्लागार सौ.सविता राजेंद्र कांबळे यांनी सलग चौथ्यांदा रक्तदान करून समाजासमोर एक आदर्श निर्माण केला आहे.. 

     नांदेड जिल्हा कॉग्रेस च्या वरिष्ठ उपाध्यक्षा डॉ.मिनलताई पाटील खतगावर तालुकाअध्यक्ष शिवाजी पाटील पाचपिंपळीकर,बाळासाहेब पाटील खतगावकर माजी नगराध्यक्षा सौ.मैथीली संतोष कुलकर्णी, भिमराव जेठे, सुनिल बेजगमवार ,युवक काँग्रेस तालुकाध्यक्ष श्रीनिवास पाटील शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती.

No comments:

Post a Comment

Pages