रविंद्र घोडविंदे यांची मुंबई विद्यापीठाच्या सिनेट सदस्यपदी निवड - Middlepathnews

लाइव न्यूज़

Friday 14 July 2023

रविंद्र घोडविंदे यांची मुंबई विद्यापीठाच्या सिनेट सदस्यपदी निवड

कल्याण:-जीवनदीप शैक्षणिक संस्थेचे  अध्यक्ष श्री.रविंद्र घोडविंदे यांची मुंबई  विद्यापीठाच्या सिनेट(अधिसभा) निवडणुकीत व्यवस्थापन  प्रतिनिधी गटातून  प्रथम पसंतीच्या मताधिक्याने विजय झाले आहे. या पूर्वीही सर मुंबई विद्यापीठाच्या विद्वत परिषदेवर सदस्य होते.श्री रवींद्र घोडविंदे यांनी जीवनदीप शैक्षणिक संस्थेच्या माध्यमातून कल्याण,शहापूर व मुरबाड तालुक्यात शैक्षणिक व सामाजिक कार्य केले आहे .त्यांच्या या उतुंग यशाबद्दल सर्वच स्तरातून कौतुकांचा वर्षाव होता आहे तसेच संस्थेचे पदाधिकारी, संचालक मंडळ,प्राचार्य, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

No comments:

Post a Comment

Pages