गुत्तेदाराचा अजब कारभार पैनगंगा नदीचे पात्र फोडत जल जिवन मिशनचा विहिरीत सोडले पाणी.! - Middlepathnews

लाइव न्यूज़

Friday 14 July 2023

गुत्तेदाराचा अजब कारभार पैनगंगा नदीचे पात्र फोडत जल जिवन मिशनचा विहिरीत सोडले पाणी.!

किनवट(प्रतिनिधी) :  किनवट तालुक्यात मोठ्या धुमधडाक्यात सगळीकडे सुरू असलेल्या जल जिवन मिशनचा कामात मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार सुरू असून जवळजवळ सगळीकडेच निकृष्ट दर्जाची कामे सुरू आहेत. असाच काहीसा प्रकार तालुक्यातील मौजे मोहपूर येथे सुरू असून गुत्तेदाराचा हा प्रकार गावातील जागरूक नागरिकांकडून आवाज उठवून हाणून पाडलेला दिसत आहे.गावात सुरु असलेल्या जलजिवन मिशन अंतर्गत विहीरीचे निकृष्ट, बोगस आणि दर्जाहिन काम चालू असून सदरील काम करणा-या कंत्राटदारने तर कहरच केला आहे,पैनगंगा नदिचे पात्र फोडत नदिचे पाणी चोरी करत सदरील जलजिवन मिशनचा नवीन विहीरीमध्ये सोडत गावातील नागरीकाच्या जिवीत्वाशीच खेळ चालवला असून सदरील पाणी चोरी करणा-या आणि निकृष्ट काम करणा-या कंत्राटदारवरती फोजदारी गुन्हे नोंद करत सदरील काम तात्काळ थांबवत या कामाची कोणतेही देयके चौकशी पूर्ण झाल्या शिवाय अदा करू नये अशी मागणी जिल्हाधिकारी साहेब,

 नांदेड आणि मुख्य कार्यकारी अधिकारी मॅडम जिल्हा परिषद नांदेड यांचे कडे समस्त गावकर्‍यांनी केली आहे.

 याबाबत सविस्तर वृत्त असे की,ग्रा.पं.मोहपूर ता.किनवट जि.नांदेड येथील गावात जन जिवन मिशन अंतर्गत हर घर जल हि पाणी पुरवठा योजना सुरु असून हे काम सोयल कन्ट्रक्शन हे करत आहे. नविन विहीर खोदली पण त्या ठिकाणी आतापर्यंत पाण्याचा कूठलाही लवलेश दिसला नाही. पैनगंगा नदीवरील बंधा-यालगत विहिरीचे खोदकाम झाले असून त्या ठिकाणी पाण्याचा कूठलाच प्रभाव दिसून आलेला नाही व विहीर खोदकाम करण्यापूर्वी टेस्टीग बोर मारण्यात आलेला नाही आणि पाणी लागले नाही म्हणुन आणि बिल काढण्यासाठी गुत्तेदारने  विहीरीत बंधा-याचं दुषीत पाणी नदीचे पात्र फोडत सोडले आहे.या दुषीत पाण्या पासून गावातील लोकांचा जिवितास धोका आहे.सदरील प्रकरणी संपूर्ण चौकशी ईन कॅमेरा गावक-याच्या समक्ष करण्यात यावी आणि भविष्यात होणा-या मरण यातनेपासून वाचवत,सदरील कामाच्या गुत्तेदार व जि.प.ग्रा. पाणी न.प.ग्रा.पा.पुरवठा. उपविभागाचे विभाग अभियंता मनमानी करत असून सदरील काम बंद करण्यात यावे सदरील कामाची कोणतीही देयके चौकशी पूर्ण होत नाही तो पर्यत आदा करण्यात येवू नयेत अशी मागणी समस्त गावकर्‍यांनी  केली आहे.

No comments:

Post a Comment

Pages