पुणे :
'मुंबईचा फौजदार', ' झुंज', ' कळत_नकळत', ' आराम हराम', अर्धांगी, सतीची पुण्याई आदी चित्रपटांतील भूमिका साकारलेले रवींद्र महाजनी यांचे निधन झाले. निधनसमयी त्यांचे वय ७७ होते. पुणे जिल्ह्य़ातील मावळ येथील एका सोसायटीतील एका बंद खोलीत शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास त्यांचा मृतदेह आढळला. 80 च्या दशकात मराठी चित्रपट सृष्टीतील हँडसम हंक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महाजनी यांनी त्यांच्या कारकिर्दीत अनेक गाजलेल्या चित्रपटांमध्ये काम केले. या एव्हरग्रीन अभिनेत्याच्या करिअरची सुरुवात टॅक्सी चालवण्यापासून झाली होती.
रविंद्र महाजनी हे एका मध्यमवर्गीय कुटुंबातील होते. अभिनय क्षेत्रात पाय ठेवण्यापूर्वी ते टॅक्सी ड्रायव्हर म्हणून काम करत. त्यांनी साधारणपणे 3 वर्षे मुंबईत टॅक्सी चालवली. मात्र, त्यांच्यातील एक कलाकार त्यांना स्वस्थ बसू देत नव्हता. ते दिवसा वेगवगेळ्या ठिकाणी जाऊन निर्मात्यांच्या भेटी घेत. रविंद्र महाजनी यांनी मराठीसह हिंदी आणि गुजराती सिनेमांमध्येही काम केले. रविंद्र महाजनी यांनी व्ही. शांताराम यांच्या झुंज या सिनेमातून कलाविश्वात पदार्पण केले होते. यानंतर त्यांनी ‘लक्ष्मी’, ‘दुनिया करी सलाम’, ‘गोंधळात गोंधळ’, ‘मुंबईचा फौजदार’ यांसारख्या चित्रपटातून भूमिका केल्या..'बेअब्रु' या हिंदी चित्रपटात भूमिका केली. आशुतोष गोवारीकर दिग्दर्शित ‘पानिपत’ चित्रपटातही त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका साकारली .
No comments:
Post a Comment