एम.फील शोध प्रबंध सादर करण्यासाठी मुदतवाढ द्या- काँग्रेसचे डॉ.अरुण शिरसाट यांची मागणी - Middlepathnews

लाइव न्यूज़

Saturday 15 July 2023

एम.फील शोध प्रबंध सादर करण्यासाठी मुदतवाढ द्या- काँग्रेसचे डॉ.अरुण शिरसाट यांची मागणी

औरंगाबाद : आज दि.१४ जुलै २०२३ रोजी काँग्रेस नेते डॉ.अरुण शिरसाट यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू यांना निवेदनाद्वारे अशी मागणी करण्यात आली की, २०१९-२० च्या विद्यार्थ्यांनी ३१ जुलै २०२३ पर्यंत आपला शोध प्रबंध सादर करने बंधनकारक राहील दिलेल्या तारखेनंतर प्रबंध स्वीकारल्या जाणार नाही जर मात्र एम.फील च्या विद्यार्थ्यांना अनेक तांत्रिक अडचणी असल्यामुळे संशोधन पूर्ण करण्यासाठी आणखी किमान सहा महिने मिळावे याकरिता निवेदन देण्यात आले, यावेळी मा.कुलगुरू महोदयांनी व  उपकुलसचिव यांच्याशी चर्चा करून सकारात्मक प्रतिसाद मिळाला येत्या दोन दिवसांत पत्राद्वारे वाढीव तारीख एम. फील च्या कामासाठी मिळेल असे आश्वासन उभयंत्यांनी दिले.

              यावेळी काँग्रेस कमिटी अनु.जा.विभागाचे शहर जिल्हाध्यक्ष डॉ.अरुण शिरसाट, प्रा.शिलवंत गोपणारायन, भागवत भोरे, अंकुश जाधव, सोनाजी गवई, अमरदीप हिवाराळे, निलेश वाघमारे, गणेश धांडे, प्रभू राऊत, अंकुश गवई इत्यादी संशोधक उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Pages