महसूल दिनानिमित्त उत्कष्ट सेवेबद्दल तहसीलदार डॉ.मृणाल जाधव यांचा गौरव - Middlepathnews

लाइव न्यूज़

Friday 4 August 2023

महसूल दिनानिमित्त उत्कष्ट सेवेबद्दल तहसीलदार डॉ.मृणाल जाधव यांचा गौरव

किनवट (प्रतिनिधी) : महसूल व वन विभागाच्यावतीने मंगळवारी (दि.01ऑगस्ट) महसूल दिनानिमित्त उत्कृष्ट कार्य करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचा नांदेड येथे जिल्हाधिकाऱ्यांकडून गौरव करण्यात आला. यात किनवटच्या तहसीलदार डॉ.मृणाल जाधव यांना त्यांच्या प्रशंसनीय तथा उल्लेखनीय कार्याबद्दल जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी प्रशस्तीपत्र देऊन सत्कार केल्यानंतर त्यांचे अभिनंदन करण्यात आले. यावेळी अनेक अधिकारी व मान्यवर उपस्थित होते. 


    शासनाने 2002 पासून महसूल दिन साजरा करण्याचे घोषित केले. तेव्हापासून 01 ऑगस्ट हा दिवस ‘महसूल दिन’ म्हणून पाळला जातो. राज्याच्या गतिमान प्रशासनामध्ये महसूल विभाग सातत्याने अग्रस्थानी आहे. निवडणूक, नैसर्गिक आपत्ती या काळात महसूल विभाग अहोरात्र काम करीत असतो. तसेच राज्यापासून खेडेगावापर्यंत शासनाची धुरा सांभाळणारा महसूल विभाग शासनाच्या अनेक विभागांना दीपस्तंभाप्रमाणे मार्गदर्शन करीत असतो.

  किनवट येथे गत काही वर्षात महसूलच्या प्रशासकीय सेवेत काम करतांना सर्व स्तरावरील कामांबाबत योग्य नियोजन व दप्तरदिरंगाई न होऊ देता शिस्तबद्धरित्या सर्व कर्मचाऱ्यांकडून उत्कष्ट कामगिरी करून घेतल्यामुळे तहसीलदार डॉ.मृणाल जाधव यांचा सन्मान करण्यात आला. 



No comments:

Post a Comment

Pages