प्रा.शाळा आंजी येथे शालेय गणवेशाचे वाटप - Middlepathnews

लाइव न्यूज़

Sunday 13 August 2023

प्रा.शाळा आंजी येथे शालेय गणवेशाचे वाटप

किनवट,दि.12(प्रतिनिधी) : आज दिनांक 12 ऑगस्ट 2023 रोजी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आंजी येथे शनिवारी (दि.12)शालेय विद्यार्थ्यांना गणवेशाचे वाटप करण्यात आले.

 आगामी 15 ऑगस्ट चा स्वातंत्र्यदिवस सर्वच भारतीय नागरिकांसाठी अभिमानाचा दिवस आहे. 15 ऑगस्ट 1947 म ध्ये आपला भारतदेश इंग्रजांच्या जोखडातून मुक्त होऊन स्वतंत्र झाला. यंदा आपण भारतीय स्वातंत्र्याचे 75 वर्ष पूर्ण केल्यामुळे त्याचा अमृत महोत्सव साजरा करीत आहोत. आपल्या मातृभूमीच्या   स्वातंत्र्यासाठी प्राणाचे बलिदान देणाऱ्या वीरांना नमन करणारा हा दिवस आहे. या निमित्ताने येणाऱ्या स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यासाठी शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना शालेय गणवेशाचे वाटप करण्यात येत असल्याची माहिती शाळेचे मुख्याध्यापक रविंद्र चौधरी यांनी दिली.


यावेळी सहशिक्षक शशिकांत कांबळे, सरपंच कैलास चिबडे, उपसरपंच सुदर्शन मेश्राम, मारोती रणमले, पोलीस पाटील धरमसिंग चायल,   तंटामुक्ती अध्यक्ष खंडू चिबडे, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष चरणसिंग चायल, गोपाल कऱ्हाळे पाटील, गजाजन डाखोरे, साहेबराव शेळके, भगवान कांबळे, संभाजी पुसाम, रामा भिसे आदी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Pages