औरंगाबाद :
डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा केंद्रीय युवक महोत्सव यंदाही विद्यापीठाच्या ’मुख्य कॅम्पस’मध्येच होण्याचा निर्णय कुलगुरु डॉ.प्रमोद येवले यांनी घेतला आहे. ४ ते ७ ऑक्टोबर दरम्यान होणा-या या युवक महोत्सवात सहा गटात ३६ कलाप्रकार सादर होणार आहेत.
विद्यापीठाच्या मुख्य परिसरात ४ ते ७ ऑक्टोबर दरम्यान महोत्सव घेण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला. यामध्ये नृत्य, नाटय, संगीत, वाड़ःमय, ललित कला व महाराष्ट्राच्या लोककला असे सहा विभाग असणार आहेत. यामध्ये ३६ कलाप्रकार असणार आहेत. संघात जास्तीत जास्त ३६ कलावंताचा सहभाग घेता येणार आहे. तसेच कलावंताचे वय २५ वर्षांपेक्षा कमी आवश्यक असून एकला कलावंतास जास्तीत जास्त पाच कलाप्रकारात सहभागी होता येणार आहे. विद्यापीठाशी संलग्नित सर्व महाविद्यालयीन येत्या ८ सप्टेंबरपर्यंत विद्यार्थी विकास विभागाकडे हरिश्चंद्र साठे यांच्याकडे विद्यार्थी कलावंताच्या यादीसह आपली नावनोंदणी करावी, असे संचालक डॉ.मुस्तजिब खान यांनी कळविले आहे.
’मुक्तीसंग्राम अमृतमहोत्सव’मुळे तारखात बदल
हैद्राबाद मुक्तीसंग्राम दिनाचे यंदाचे अमृत महोत्सवी वर्ष आहे. त्यामुहे १७ सप्टेंबर दरम्यान महाविद्यालयांमध्ये सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत. तसेच १४ सप्टेंबर रोजी बैलपोळा आहे. या पार्श्वभूमीवर ऑक्टोबरला क्रीडा युवक महोत्सव घेण्याची सूचना मा.कुलगुरु डॉ.प्रमोद येवले यांनी केली. महोत्सवाच्या तयारीसाठी विविध समित्या गढीत करण्यात येणार आहेत.
No comments:
Post a Comment