औरंगाबाद :
डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद येथे एम. फील ह्या अभ्यासक्रमच्या लघुप्रबंध सादर करण्याचा कालावधी वाढवून मिळावा याकरिता १४ जुलै २०२३ रोजी दिलेल्या निवेदनाला मान्यता म्हणून कुलगुरू महोदयांनी व उपकुलसचिव महोदयांनी चर्चा करून लघुप्रबंध सादर करण्यासाठी दोन महिन्याची म्हणजे ३० सप्टेंबर २०२३ पर्यंत मुदतवाढ दिली आहे, या मागणीच्या पूर्ततेमुळे विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण होऊन त्यांना खूप मोठा दिलासा मिळाला आहे.वरील मागणीचे निवेदन देण्याकरिता प्रा.शिलवंत गोपणारायन, योगगुरू भागवत भोरे पाटील, सोनाजी गवई, गणेश धांडे, अमरदीप हिवराळे, अंकुश जाधव, डॉ.अंकुश गवई, संदीप खंदारे आदी पदाधिकारी व संशोधक मोठया संख्येने उपस्थित होते.
No comments:
Post a Comment