महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेने दिले शिक्षण आयुक्तांना निवेदन - Middlepathnews

लाइव न्यूज़

Friday 25 August 2023

महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेने दिले शिक्षण आयुक्तांना निवेदन

लोहा,(प्रतिनिधी) जयवर्धन भोसीकर :

   महाराष्ट्र राज्याचे शिक्षण आयुक्त सुरज मांढरे काल दि.(२३) ऑगस्ट रोजी नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले असता महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेचे राज्य उपाध्यक्ष विठूभाऊ चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली शिक्षकांच्या विविध मागण्यांचे निवेदन देऊन प्रश्नाबाबद चर्चा केली व शिक्षक सेनेच्या वतीने स्वागत करण्यात आले

     सदरील निवेदनात जि प शाळेच्या सर्व खोल्यांचे संरचनात्मक लेखा परीक्षण करण्याच्या प्रमुख मागणी सह विविध मागण्या नमूद केल्या. केंद्रप्रमुखांची पद तात्काळ भरा, सातव्या वेतन आयोगाची हप्ते जमा करण्यासंदर्भात अनिमियमिततेची चौकशी करा, शिक्षकांची थकीत वेतन,वैद्यकीय बिल सहा सहा महिन्यापासून प्रलंबित आहेत, शिक्षकांचे अशैक्षणिक कामे काढून घेणे पदोन्नत मुख्याध्यापकांची पदं भरणे, 24 वर्ष झालेल्या शिक्षकांना निवड श्रेणी मिळणे, शालेय विद्यार्थ्यांचे स्काऊट गाईडचे गणवेश रकमेत वाढ करणे. विषय शिक्षकांची रिक्त पदे भरणे, वेतनश्रेणी देणे शालेय माहितीचे टप्पे कालबद्ध पद्धतीने मागविणे यासह आदी मागण्यांचे पाच पानी निवेदन जि प शाळा आणि शिक्षकांशी संबंधित आदी समस्यांचे सविस्तर असे दससुत्री मागण्यांचे निवेदन शिक्षण आयुक्त सुरज मांढरे यांना शिक्षक सेनेच्या वतीने देण्यात आले.

यावेळी शिक्षक सेनेचे राज्य उपाध्यक्ष विठुभाऊ चव्हाण, जिल्हाध्यक्ष संतोष अंबुलगेकर,जिल्हा उपाध्यक्ष गंगाधर ढवळे सर,बालाजी भांगे सर,लहू पंदलवाड सर,सौ.हेमा जोशी मॅडम,शिरसाळकर सर,हि.नगर ता.अध्यक्ष रामदास देशमुख सर,लोहा ता.अध्यक्ष संभाजी पवार.आदी पदाधिकारी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Pages