महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालयात स्वातंत्र्यदिन उत्साहात संपन्न - Middlepathnews

लाइव न्यूज़

Tuesday 15 August 2023

महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालयात स्वातंत्र्यदिन उत्साहात संपन्न

किनवट :

 महात्मा ज्योतिबा फुले माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय गोकुंदा येथे  77 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त राष्ट्रध्वजारोहन सोहळा संपन्न झाला याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष डॉ आनंदराव ठमके  यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. तसेच संस्थेचे सचिव  अभि. प्रशांतजी ठमके साहेब, संस्थेच्या कोषाध्यक्षा आदरणीया शुभांगीताई ठमके, मुख्याध्यापक तथा प्राचार्य हैदर शेख , उपप्राचार्य सुभाष राऊत , उपमुख्याध्यापक अंबादास जुनगरे , पर्यवेक्षक संतोषसिंह बैसठाकूर , किशोर डांगे , प्रमोद मुनेश्वर , गावातील प्रतिष्ठित नागरिक  शेख सलीम भाई,  गणपतराव घुले  , शाळेचे माजी मुख्याध्यापक  चंद्रे  माजी पर्यवेक्षक नरवाडे  ,प्रा. वाठोरे , सेवानिवृत्त शिक्षक अशोक भरणे ,तसेच सर्व शिक्षक, शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी   यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.


विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाचे सर्व विद्यार्थी व विद्यार्थिनी यांची गोकुंदा गावांमध्ये प्रभातफेरी काढण्यात आली.मोठ्या संख्येने विद्यार्थी व विद्यार्थिनी यात सहभागी झाले होते.

No comments:

Post a Comment

Pages